व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या दीपके भेटीने महायुतीत अस्वस्थता; एकनाथ शिंदे नाराज?

Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या दीपके भेटीने महायुतीत अस्वस्थता; एकनाथ शिंदे नाराज?

Bacchu kadu meets Abhijeet dipke, unrest in Mahayuti : पक्षश्रेष्ठींना पूर्वकल्पना न देता घेतला निर्णय; शिवसेनेबाबत नाराजी

Amravati कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आंदोलनानंतर झालेल्या एका भेटीने महायुतीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. शिंदेसेनेत नुकतेच दाखल झालेले बच्चू कडू आणि शिंदे गटातील अन्य पदाधिकाऱ्यांनी दीपके यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या भेटीनंतर महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मित्रपक्षांतील समन्वय आणि राजकीय शिष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर अशा भेटींबाबत पक्षश्रेष्ठींना पूर्वकल्पना देणे अपेक्षित होते का, अशी चर्चा काही कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

SIR campaign : दिव्याखाली अंधार! ‘एसआयआर’मध्ये अमरावती जिल्हा अव्वल, पण अमरावती शहर संथ

दरम्यान, या घडामोडींमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. मात्र, याबाबत शिंदे गटाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे येत्या काही दिवसांतील राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!