व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bacchu kadu : कर्जमाफीवर बच्चूभाऊंचा बदलला सूर, म्हणाले ‘सर्वांना कर्जमाफी नको’

Bacchu kadu : कर्जमाफीवर बच्चूभाऊंचा बदलला सूर, म्हणाले ‘सर्वांना कर्जमाफी नको’

Bacchu Kadu states that not all farmers need loan waivers : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच दोन लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची मागणी

Buldhana बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना “सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नसते; केवळ खऱ्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच दोन लाख रुपयांपर्यंत मदत द्यावी,” अशी भूमिका बच्चूभाऊंनी मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

एकेकाळी शेतकरी आंदोलनांचे आक्रमक नेतृत्व करत सरकारविरोधात रस्त्यावर उतरणारे बच्चूभाऊ आता तुलनेने संयमित आणि आर्थिक वास्तव मांडणारी भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सत्तेच्या समीकरणांमुळे बच्चूभाऊंचा राजकीय सूर बदलला का, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

Sunetra pawar : राष्ट्रवादीत राष्ट्रीय कार्यकारिणीवरून खळबळ; प्रफुल पटेल, तटकरे यांची नावं गायब !

राजकीय निरीक्षकांच्या मते, बच्चूभाऊंच्या या वक्तव्याकडे केवळ आर्थिक धोरणाच्या दृष्टीने पाहून चालणार नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आर्थिक स्थिती, वाढता कर्जभार आणि सरकारी तिजोरीवरील दबाव लक्षात घेता सर्वसमावेशक कर्जमाफीऐवजी लक्षित मदतीचा पर्याय पुढे करण्याचा प्रयत्न सत्ताधारी गटाकडून होत असल्याची चर्चा सुरू आहे. बच्चूभाऊंच्या विधानातून त्याच भूमिकेचे प्रतिबिंब दिसत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, शेतकरी संघटनांमध्येही या वक्तव्यावरून मतमतांतरे दिसून येत आहेत. काहींच्या मते, खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच मदत देण्याची भूमिका वास्तववादी आहे; तर काहींनी ही भूमिका शेतकरी हितापासून दूर जाणारी असल्याची टीका केली आहे. विशेषतः सर्वसमावेशक कर्जमाफीची मागणी करणाऱ्या संघटनांनी बच्चूभाऊंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Bollywood news : ‘तुम तो ठहरे परदेसी…’ या अजरामर गीताचे गीतकार जहीर आलम यांचे नागपुरात निधन

राजकीय पातळीवर पाहता, बच्चूभाऊंची ओळख ही आक्रमक आणि शेतकरीहिताच्या मुद्द्यांवर थेट संघर्ष करणारे नेते अशी राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नवा संदेश जात असल्याची चर्चा रंगली आहे. आगामी काळात कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका आणि बच्चूभाऊंची पुढील भूमिका काय राहते, याकडे आता शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!