Chief Minister Devendra Fadnavis said on NCP chief Sharad Pawar’s allegations, Jo Jeeta wahi Sikandar : भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त आदिवासी हक्कांचे स्मरण; बिहार विजय, महायुतीवरील जनतेचा विश्वास आणि राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर फडणवीसांची स्पष्ट भूमिका
Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भगवान बिरसा मुंडांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आदिवासी समाजाला अभिवादन केले. त्यांच्या जल, जंगल आणि जमीन हक्कासाठीच्या ऐतिहासिक संघर्षाचे स्मरण केले. भगवान बिरसा मुंडा यांनी संपूर्ण जीवन आदिवासींच्या हक्कांसाठी अर्पण केले. त्यांच्या जयंतीचे संपूर्ण वर्ष जनजाती कल्याण वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे, असे फडणवीस म्हणाले.
देशभर मोठ्या प्रमाणावर या निमित्ताने कार्यक्रम सुरू आहेत, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या आरोपांना फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. निवडणुकीत जो जिंकतो तोच सिकंदर ठरतो. पराभवानंतर हार स्वीकारण्याचे धैर्य, आत्मपरीक्षणाची वृत्ती आणि चुका मान्य करण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही, असा फडणवीसांचा पलटवार होता. सतत पराभवाचे खापर इतरांवर फोडण्याची त्यांची प्रवृत्ती असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
Winter Session : नागपुरात 28 नोव्हेंबरपासून विधानमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू !
बिहार निवडणुकीतील विजयावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, विविध प्रकारच्या योजना राबवण्याची मुभा सर्वांना होती. मात्र आम्ही राबवलेल्या योजना लोकांच्या मनाला भिडल्या, म्हणूनच लोकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट राजकीय चर्चेसाठी असल्याच्या विरोधकांच्या आरोपांवरही फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले. अजित पवार यांनी शहा यांची भेट राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी घेतली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
Dr. Mohan Bhagwat : स्वार्थावर चाललेले जग आनंद देऊ शकत नाही, सद्भावना हा भारताचा स्वभाव !
राज्यात वाढलेल्या बिबट्यांच्या दहशतीबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करणार असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली. ग्रामीण भागात वाढलेली वन्यजीवांची हालचाल रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, विरोधक एकत्र लढणार की स्वतंत्रपणे, हे महत्त्वाचे नसून मुंबईकरांचा महायुतीवर असलेला विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. जनतेने महायुतीचा महापौर ठरवला आहे. तापलेल्या राजकीय परिस्थितीत फडणवीसांच्या या सर्वसमावेशक प्रतिक्रियांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा रंग चढला आहे.








