व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Buldhana health : बुलढाण्यात १४ रुग्णवाहिका बंद; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा...

Buldhana health : बुलढाण्यात १४ रुग्णवाहिका बंद; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप

14 ambulances out of service in Buldhana; allegations of risking patients’ lives surface : १०२ रुग्णवाहिका सेवा ठप्प; गर्भवती, अपघातग्रस्त रुग्णांना मोठा फटका

Buldhana केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातच १०२ रुग्णवाहिका सेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, चालकांच्या अभावामुळे तब्बल १४ रुग्णवाहिका गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे गर्भवती महिला, अपघातग्रस्त, पॉयझन बाधित रुग्ण तसेच नवजात बालकांना मोठा फटका बसत असल्याची संतप्त प्रतिक्रिया संबंधित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे ही सेवा बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रेय बिराजदार हे प्रशासकीय मान्यता मिळविण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, जोपर्यंत कायमस्वरूपी मान्यता मिळत नाही, तोपर्यंत रोजंदारी तत्त्वावर चालकांची नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. रुग्णवाहिका बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नसल्याचे समोर आले आहे. विशेषतः उष्माघाताच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

caste certificate : खामगावात काँग्रेस नगरसेवकाचे ‘कासार’ जात प्रमाणपत्र रद्द

वाहन चालकांचे तब्बल १५ महिन्यांचे मानधन थकीत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोपही करण्यात आला. या संदर्भात आरोग्यमंत्री, सहसंचालक, संचालक तसेच जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदने देण्यात आल्याचे सांगण्यात आले.या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या वर्षभरात दोन उपोषणे, दोन आत्मदहनाच्या इशाऱ्यांसह विविध आंदोलने करण्यात आली.

Water supply affected : महावितरणच्या मेंटेनन्सचा फटका, मलकापुरात आता १४ दिवसांआड पाणीपुरवठा

मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.“रुग्णांच्या जीवाशी खेळणे प्रशासनाने थांबवावे. लवकरात लवकर चालकांना सेवेत रुजू करून त्यांचे थकीत वेतन द्यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

error: Content is protected !!