व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar Bawankule, Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणाऱ्या बावनकुळेंनी विधानपरिषदेसाठी...

Chandrashekhar Bawankule, Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणाऱ्या बावनकुळेंनी विधानपरिषदेसाठी दिल्या शुभेच्छा

 

Chandrashekhar Bawankule extends best wishes to Bacchu Kadu for the Legislative Council election : एकनाथ शिंदेंनी शिवसेनेकडून ऑफर दिल्याची चर्चा, बावनकुळेंची प्रतिक्रिया चर्चेत

Nagpur राज्याच्या राजकारणात सध्या विधान परिषदेच्या आगामी नियुक्त्यांवरून खलबतं सुरू असतानाच, अमरावतीचे फायरब्रँड नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर दिली आहे. मात्र, या ऑफरसोबतच ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ शिवसेनेत विलीन करावा, अशी अट घातल्याचे समजते. या नाट्यमय घडामोडींवर भाजपचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

महाविकास आघाडीच्या काळात राज्यमंत्री राहिलेले बच्चू कडू यांनी सत्तांतराच्या वेळी एकनाथ शिंदेंना साथ दिली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचा अनपेक्षित पराभव झाला. महायुतीत जागावाटपावरून खटके उडाल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे ‘प्रहार’चे उमेदवार रिंगणात उतरवले होते, पण तिथे त्यांना मोठे यश मिळाले नाही. आता विधान परिषदेच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन करण्याची संधी समोर असली, तरी स्वतःचा स्वतंत्र पक्ष विसर्जित करून शिवसेनेत जाणे कडू यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

Jigao Project : पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमदारांना ‘डावलले’; महायुतीत अंतर्गत कलहाचे संकेत

बच्चू कडू आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. विशेषतः शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनावरून उभय नेत्यांमध्ये मोठे वाद झाले होते. कडू यांच्या आंदोलनाचा उल्लेख बावनकुळे यांनी ‘नौटंकी’ असा केल्याने विदर्भाचे राजकारण चांगलेच तापले होते. आज जेव्हा बच्चू कडूंच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या, तेव्हा बावनकुळे यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत माझ्या त्यांना शुभेच्छा म्हणत प्रतिक्रिया व्यक्त केली. बच्चू कडू महायुतीचा भाग झाले तर आम्हाला आनंदच आहे, असे म्हणत बावनकुळेंनी औपचारिकता पाळली असली, तरी कडूंच्या शिवसेना प्रवेशाच्या हालचालींमुळे महायुतीमधील अंतर्गत समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.

Sanjay Gaikwad controversy : माफीवीर’ टोला अन् राजकारण पेटले; गायकवाड प्रकरणाने घेतला नवा टर्न!

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी ३ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली, याचे श्रेय बच्चू कडू आपल्या आंदोलनाला देतात. मात्र, या निर्णयाने कडू पूर्णपणे समाधानी नसून त्यांनी आजही सरकारवर टीकेची झोड उठवणे सुरूच ठेवले आहे. अशा परिस्थितीत कडू यांनी शिंदेंची ऑफर स्वीकारली, तर ते पुन्हा सत्तेच्या प्रवाहात येतील; परंतु ‘विलीनीकरणाच्या अटी’मुळे त्यांना आपल्या स्वतंत्र अस्तित्वावर पाणी सोडावे लागणार आहे. बच्चू कडू यांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नसली, तरी या राजकीय घडामोडींमुळे विदर्भासह राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

error: Content is protected !!