BJP openly supported Yuva Swabhiman candidates in three wards : तीन प्रभागांत युवास्वाभिमान उमेदवारांना भाजपचा उघड पाठिंबा
Amravati महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी वाटपावरून भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात उफाळलेला असंतोष उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीही कायम राहिला. नाराज भाजप कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी नेते एकत्र येत शहरातील राजकमल चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
तिकीट वाटपावरून सुरू झालेले नाराजीचे नाट्य पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीनंतर शांत होईल, अशी अपेक्षा पक्षाच्या वरिष्ठांना होती. मात्र पक्षनिरीक्षक आ. संजय कुटे यांच्यासह पालकमंत्री बावनकुळे यांच्या विरोधात संतप्त कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात एकत्र येत तीव्र नारेबाजी केली. या प्रकारामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकही थक्क झाले.
Lonar Municipal council results काँग्रेसची ताकद वाढली; सीमा शिंदे गटनेतेपदी बिनविरोध
नाराजीमुळे पालकमंत्र्यांचा दौरा बदलला
कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांचा नियोजित दौरा बदलावा लागला. ते सकाळी ११ वाजता श्री अंबादेवी मंदिरात दर्शनासाठी येणार होते, मात्र याच मार्गावर राजकमल चौकात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे त्यांनी दर्शन टाळले आणि थेट अकोल्याकडे प्रस्थान केले.
नाराज कार्यकर्त्यांनी “पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही उमेदवारीत डावलण्यात आले” असा आरोप केला. वरिष्ठांच्या घरातील व्यक्तींनाच तिकीट देण्यात आले, असा आक्षेपही यावेळी उपस्थित करण्यात आला.
झोन कार्यालयातही संताप
राजापेठ येथील महापालिकेच्या झोन कार्यालयात भाजप नेते दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुलकर्णी आणि जयंत डेहनकर यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. याच ठिकाणी श्री कालीमाता मंदिर संस्थानचे शक्ती महाराज यांचा जाहीर अपमान झाल्याचा आरोप असून, त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Akola municipal corporation election : १६४ उमेदवारांची माघार; ४६९ आजमावणार नशीब
धक्कादायक निर्णय : तीन प्रभागांत युवास्वाभिमान उमेदवारांना भाजपचा पाठिंबा
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने घेतलेल्या एका अनपेक्षित निर्णयामुळे शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार असतानाही तीन प्रभागांमध्ये युवास्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना भाजपचा उघड व लेखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
भाजप अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने २ जानेवारी २०२६ रोजी युवास्वाभिमान पक्षाला अधिकृत पत्र देण्यात आले असून, हे पत्र शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.








