व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar Bawankule on Vijay Wadettiwar : राहुल गांधींना खुश करण्यासाठी वडेट्टीवारांची स्फोटक...

Chandrashekhar Bawankule on Vijay Wadettiwar : राहुल गांधींना खुश करण्यासाठी वडेट्टीवारांची स्फोटक बॅटिंग; बावनकुळेंचा खोचक टोला

Chandrashekhar Bawankule takes a dig at Vijay Wadettiwar, alleging “explosive batting” to please Rahul Gandhi : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेची तुलना केल्यानंतर होतेय राजकीय टीका

Nagpur अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेची तुलना भारतीय परिस्थितीशी करणे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे. वडेट्टीवारांच्या या ‘स्फोटक’ विधानाचा राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. काँग्रेसमध्ये सध्या राहुल गांधींना खुश करण्यासाठी कोण जास्त स्फोटक बोलतंय, याची जणू स्पर्धाच लागली आहे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

नागपुरात माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस नेत्यांचे लक्ष सध्या जनहितापेक्षा दिल्लीतील श्रेष्ठींचे लक्ष वेधून घेण्याकडे जास्त आहे. वडेट्टीवार असोत, नाना पटोले असोत की अधूनमधून बॅटिंग करणारे विकास ठाकरे; या सर्वांना फक्त राहुल गांधींची सहानुभूती मिळवायची आहे. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची तुलना भारताशी करणे हे केवळ प्रसिद्धीसाठी केलेले स्टंट असून वडेट्टीवार यांचे वक्तव्य हे त्याच स्पर्धेचा एक भाग आहे. १४० कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मोदींनी लोकांमध्ये एवढा विश्वास संपादन केला आहे की, कोणताही भारतीय त्यांच्याबाबत असा हिंसक विचारही करू शकत नाही.

Chandrashekhar Bawankule, Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणाऱ्या बावनकुळेंनी विधानपरिषदेसाठी दिल्या शुभेच्छा

वडेट्टीवार यांनी भारतीय संस्कृती आणि संस्कार समजून घेण्याची गरज असल्याचे सांगत बावनकुळे पुढे म्हणाले की, आपल्याकडे राजकीय मतभेद किंवा विचारांची लढाई असू शकते, पण अशा प्रवृत्तीला आपल्या संस्कृतीत स्थान नाही. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवत त्यांनी चिमटा काढला की, काँग्रेसमध्ये सध्या नेत्यांमध्येच आपापसात स्पर्धा सुरू आहे. स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि दिल्लीत आपली नोंद व्हावी, यासाठी वडेट्टीवार अशी विधाने करून स्वतःचे हसे करून घेत आहेत. ट्रम्प यांच्यावरील गोळीबारावरून सुरू झालेले हे वाकयुद्ध आता नागपूरच्या राजकीय आखाड्यात रंगले असून बावनकुळेंच्या या खुसखुशीत उत्तरामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

error: Content is protected !!