Congress stage charkha satyagrah for transperent election process : निःपक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी चरखा घेऊन रस्त्यावर
Malkapur देशातील लोकशाही परंपरा अबाधित राहाव्यात आणि निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक व भयमुक्त व्हावी, या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मलकापूर शहरात ‘चरखा सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चरख्याचे प्रतीक हातात घेऊन काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी शांततापूर्ण पद्धतीने लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याचा संदेश दिला.
या आंदोलनातून निवडणूक प्रक्रिया केवळ घटनात्मक औपचारिकता नसून ती लोकशाहीचा कणा असल्याचे अधोरेखित करण्यात आले. “लोकशाही टिकवायची असेल, तर निवडणूक प्रक्रिया स्वच्छ, पारदर्शक आणि कोणत्याही दबावापासून मुक्त असणे आवश्यक आहे,” असा संदेश आंदोलनकर्त्यांनी दिला. चरखा हे गांधीवादी संघर्ष, संयम आणि लोकशक्तीचे प्रतीक मानले जाते. त्याच प्रतीकाचा आधार घेत काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
सदर आंदोलनाचे आयोजन राजू पाटील, प्राची कोलते, ज्योती अजय तायडे (माजी सभापती, पंचायत समिती खामगाव), पूर्वा अविनाश उमरकर, अविनाश उमरकर (राजीव गांधी पंचायती राज समिती समन्वयक तथा माजी पंचायत समिती सदस्य, जळगाव जामोद) आणि श्रीनिवास संगम समिती, नांदेड यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
या ‘चरखा सत्याग्रह’ आंदोलनात माजी आमदार राजेश एकडे, भाराकाँ नेते डॉ. अरविंद कोलते, नगराध्यक्ष आतिकभाई जवारीवाले, न.प. भाराकाँ गटनेते रशीद खाँ जमादार, न.प. उपाध्यक्ष अनिल गांधी, शहराध्यक्ष रईस जमादार, पाणीपुरवठा सभापती शहेजाद खान, जाकीर मेमन, अॅड. जावेद कुरेशी, बन्सीभाऊ पाचपांडे, श्याम चव्हाण, पुरुषोत्तम झाल्टे, विजूबाप्पा निर्मल, दिलीप गोळीवाले, अरुण गावात्रे, हनुमान जगताप, अनिल भारंबे, तुषार पाटील, सचिन पाटील, भागवत पाटील, प्रमोददादा अवसरमोल, अनिल जयस्वाल, स्वाती खर्चे, शेख नजीन, प्रा. डॉ. अनिल खर्चे, विकास देशमुख, बंडूभाऊ चौधरी, ईश्वर भदाले, सिद्धांत इंगळे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.








