व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Cooperative sector : जिल्हा बँकेची निवडणूक; अमरावतीच्या सहकार क्षेत्रात धामधूम

Cooperative sector : जिल्हा बँकेची निवडणूक; अमरावतीच्या सहकार क्षेत्रात धामधूम

2,825 Voters in Amravati District Central Cooperative Bank’s Draft Voter List : एडीसीसी बँकेच्या प्रारूप मतदार यादीत २,८२५ मतदार, १४ ऑक्टोबरला अंतिम यादी होणार प्रसिद्ध

Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) आगामी निवडणुकीसाठी २ हजार ८२५ मतदारांचा समावेश असलेली प्रारूप मतदार यादी सोमवारी (२१ सप्टेंबर) जाहीर करण्यात आली. या यादीवर ३० सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. हरकती-सूचनांवर निर्णय झाल्यानंतर १४ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एडीसीसी बँकेच्या २० सदस्यीय संचालक मंडळाचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यामुळे सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाने आगामी निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक निर्धारित मुदतीत होणार नसली, तरी प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्याने निवडणूक प्रक्रिया पुढे सरकली आहे.

Teacher’s constituency : ‘ज्याची समस्या, त्याचेच नेतृत्व’; शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांनाच उमेदवारीची मागणी

अमरावती तालुक्यात सर्वाधिक मतदार

प्रारूप मतदार यादीतील मतदारसंख्येत अमरावती तालुका आघाडीवर आहे. अमरावती तालुक्यात ७०७ मतदार आहेत. त्याखालोखाल चांदूर बाजारमध्ये ३७८, अचलपूरमध्ये ३२९, दर्यापूरमध्ये २८२, वरुडमध्ये २२६ आणि मोर्शीमध्ये २२५ मतदार आहेत.

अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८७, नांदगाव खंडेश्वरमध्ये १७१, तिवसा येथे ८२, धामणगाव रेल्वेत ७२, भातकुलीत ६४, चांदूर रेल्वेत ५०, धारणीत २८, तर चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे २४ मतदारांची नोंद आहे.

Sanjay Raut : ‘दुष्काळाच्या बैठका स्टेडियमवर घ्या आणि लोकांना कळू द्या’; संजय राऊतांचा टोला

सत्ताधारी-विरोधकांमध्ये चुरस

गेल्या अडीच वर्षांपासून बँकेच्या सत्ताधारी आणि विरोधी संचालकांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सत्ताधारी बच्चू कडू-अभिजीत ढेपे गट आणि विरोधी काँग्रेस गट यांच्यात चुरस होण्याची शक्यता आहे.

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मतदानाची तारीखही त्यानंतर जाहीर केली जाईल. त्यामुळे एडीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!