व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Draught relief : खचून जाऊ नका, प्रत्येक बाधिताला मदत करू; मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना...

Draught relief : खचून जाऊ नका, प्रत्येक बाधिताला मदत करू; मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना शब्द

Chief Minister Devendra Fadnavis assures farmers during Washim visit that the state will soon declare a dry drought : राज्यात लवकरच कोरडा दुष्काळ जाहीर करणार; वाशिम दौऱ्यावर मदतीची ग्वाही

Washim राज्यात ओढवलेल्या भीषण दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शेताच्या बांधावर उतरून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता, सरकार लवकरच ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करणार असून याबाबतचा शासनादेश तातडीने काढला जाईल, अशी ग्वाही दिली.

दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्ह्यातील कामगाव येथील शेतात उतरून करपलेल्या पिकांची पाहणी केली आणि पीडित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. दुष्काळामुळे कोणीही खचून जाऊ नये, सरकार खंबीरपणे पाठीशी असून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला मदत दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच वेळी त्यांनी एक मोठी घोषणा करत स्पष्ट केले की, २०१६-१७ च्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून जे शेतकरी वंचित राहिले होते, त्यांनाही या संकटकाळात विशेष मदत पुरवली जाईल.

Raj Thackeray : निवडणुका म्हणजे निव्वळ ‘मॅचफिक्सिंग’, राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला

गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे विशेषतः मराठवाडा आणि पूर्व विदर्भात उभी पिके पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या परिस्थितीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण भागाचे तातडीने पंचनामे करून त्वरित उपाययोजना राबवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार सर्व मंत्र्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत मंत्रिमंडळाची एक उपसमिती स्थापन केली आहे. केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला जाणारच आहे, परंतु केंद्राच्या निधीची वाट न पाहता त्यापूर्वीच राज्य शासन स्वतःच्या तिजोरीतून मदत जाहीर करून तिचे वाटप सुरू करेल, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा दिला

error: Content is protected !!