Shivsena akola district chief ashwin navle resigns : शिवसेनेत अंतर्गत कलह उफाळला; जिल्हाप्रमुखाचे माजी आमदारावर थेट आरोप
Akola शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. पक्षाचे अकोला जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षातील नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र असमाधान व्यक्त करत नवले यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
नवले यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा पत्र पाठविले. पत्रात त्यांनी नमूद केले की, पक्ष स्थापनेपासून आपण निष्ठेने काम केले आणि अकोला जिल्ह्यात संघटन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या कार्यशैलीमुळे पक्षात काम करणे कठीण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Shikshak Bank : शिक्षक बँकेतील चार दिग्गज संचालक अपात्र; पद खारीज करण्याचे आदेश
नवले यांनी पत्रात बाजोरिया यांच्यावर थेट टीका करत, “विचारहीन आणि स्वार्थी वृत्तीच्या व्यक्तीसोबत काम करणे मान्य नाही. आम्ही समाजसेवक आहोत आणि राहू; मात्र पक्षपदासाठी कुणाचे गुलाम बनून राहू शकत नाही,” अशा शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली.
Amravati Sexual exploitation case : लैंगिक शोषण प्रकरणात फ्लॅट आणि दोन कॅफे एसआयटीच्या रडारवर
या राजीनाम्यामुळे अकोला जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडीनंतर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








