व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Grampanchayat election : सरपंचांवरील अविश्वास फेटाळला; नलिता गरड यांना जनतेचा कौल

Grampanchayat election : सरपंचांवरील अविश्वास फेटाळला; नलिता गरड यांना जनतेचा कौल

No-confidence motion against Sarpanch rejected; Nalita Garad wins public mandate : गटबाजीवर विकासाचा विजय; खैरव ग्रामस्थांचा सरपंच गरड यांच्यावरच विश्वास

Deulgao mahi खैरव ग्रामपंचायतीच्या सरपंच नलिता राजेंद्र गरड यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेर ग्रामस्थांनी फेटाळून लावला. मतदान प्रक्रियेत सरपंच गरड यांना स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.

सरपंच गरड या थेट जनतेतून निवडून आल्या असून, अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मतदानात ठरावाच्या बाजूने १५१ मते पडली, तर गरड यांच्या बाजूने १९० मते मिळाली. त्यामुळे त्यांना ३९ मतांची आघाडी मिळाली असून, गावकऱ्यांचा पाठींबा त्यांना असल्याचे स्पष्ट झाले. राजकीय पातळीवर या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत सदस्यांमधील मतभेद, स्थानिक गटबाजी आणि काही निर्णयांवरून निर्माण झालेला तणाव याच्या पार्श्वभूमीवर हा अविश्वास ठराव आणण्यात आल्याची चर्चा होती.

load shedding : वीज पुरवठा वारंवार खंडीत, शेतकऱ्यांनी अभियंत्यांना कार्यालयातच कोंडले

विशेषतः काही सदस्यांकडून आरोग्य उपकेंद्रासमोरील अतिक्रमण नियमित करण्याचा आग्रह तसेच रोजगार हमी योजनेतील कामांबाबत वाद निर्माण झाला होता. मात्र, नियमबाह्य मागण्यांना सरपंच गरड यांनी विरोध दर्शविल्याने मतभेद तीव्र झाले, असे सांगितले जाते. गेल्या तीन वर्षांत सरपंच गरड यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांवर भर देत विकासकामांना गती दिल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याच विकासकामांच्या जोरावर त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केल्याचे या निकालातून दिसून आले.

Vidhan parishad election : काँग्रेसकडून थोरात, सकपाळांसह सहा दिग्गज मैदानात!

 

विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत केवळ एका मताने विजयी झालेल्या गरड यांनी यावेळी सुमारे ४० मतांची आघाडी घेत आपला वाढता जनाधार सिद्ध केला आहे. त्यामुळे हा निकाल केवळ अविश्वास ठरावाचा पराभव नसून, स्थानिक राजकारणात त्यांच्या नेतृत्वाची पकड अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या प्रक्रियेसाठी नायब तहसीलदार प्रवीण वराडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

error: Content is protected !!