Farmers lock engineers inside the office over frequent power outages : दाताळ्यात आश्वासनानंतर निवळला तणाव; वीजपुरवठा पुन्हा सुरळीत
Malkapur गेल्या दोन महिन्यांपासून संध्याकाळी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दाताळा विद्युत केंद्रात आक्रमक पवित्रा घेत अभियंत्यांना कार्यालयात कोंडून ठेवले. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर प्रशासनाने हस्तक्षेप करून अखंड वीजपुरवठ्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दाताळा विद्युत केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सायंकाळी ६ ते १० या वेळेत शेतासाठीचा सिंगल फेज वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकरी, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. या समस्येबाबत किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता तायडे यांना यापूर्वी निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली.
Vidhan parishad election : काँग्रेसकडून थोरात, सकपाळांसह सहा दिग्गज मैदानात!
याच पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी दाताळा विद्युत केंद्र गाठत अभियंता श्रीधनकर यांच्या केबिनला कुलूप ठोकून त्यांना आत कोंडून ठेवले. “जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत माघार नाही,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. या आंदोलनात संतोष राजपूत, दीपक राजपूत, भय्या तायडे, सुनील वानखेडे, योगेंद्र राजपूत, सूरज राजपूत यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
Nashik crime news : एकाच दिवशी माजी महापौर, गटनेते आणि माजी नगरसेवकावर गुन्हे दाखल
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप केला. आजपासून वीजपुरवठा खंडित न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी कुलूप उघडून अभियंत्यांची सुटका केली. त्यानंतर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
दरम्यान, शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही चोवीस तास वीजपुरवठा मिळणे हा त्यांचा अधिकार असल्याचे मत संभाजी शिर्के यांनी व्यक्त केले. भविष्यात शेतकऱ्यांना त्रास झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.








