व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Harshvardhan Sapkal : मोदींच्या १२ वर्षांत ‘राम’ही नाही, ‘काम’ही नाही; नेहरूंशी तुलना...

Harshvardhan Sapkal : मोदींच्या १२ वर्षांत ‘राम’ही नाही, ‘काम’ही नाही; नेहरूंशी तुलना म्हणजे इतिहासाचा अपमान

No ‘Ram’, No ‘Kaam’ in Modi’s 12-Year Rule; Comparing Him to Nehru is an Insult to History : गिरीश महाजन यांचे विधान खलिस्तान समर्थक; मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी

Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम केला असला, तरी त्यांच्या १२ वर्षांच्या कारभारात देशाला काय मिळाले याचा हिशेब देशासमोर ठेवावा, असे आव्हान करत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “मोदी सरकारमध्ये ‘राम’ही नाही आणि दाखवण्यासारखे एकही ‘काम’ही नाही,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

मुंबईतील टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी १५ लाख रुपये, दरवर्षी २ कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, हमीभाव, १०० स्मार्ट सिटी, स्वस्त पेट्रोल-डिझेल आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार अशी अनेक आश्वासने दिली; मात्र त्यापैकी एकही पूर्ण झाले नाही. उलट देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली, रुपयाची घसरण झाली, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’सारख्या योजना अपेक्षित यश मिळवू शकल्या नाहीत. मोदी सरकारची ओळख आता ‘हम दो, हमारे दो’ अशी झाली असून हे सरकार मुठभर उद्योगपतींसाठी काम करत आहे.

Prafulla Gudadhe : भाजपनेच २०१९ मध्ये बावनकुळेंचे शटर पाडले; आता ते इतरांना दुकानदारी शिकवत आहेत!

नेहरू आणि मोदी यांची तुलना होऊच शकत नाही, असे सांगताना सपकाळ म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर भारताची पायाभरणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. मोठी धरणे, वैज्ञानिक संस्था, IIT, IIM, अणुशक्ती आणि अवकाश संशोधन क्षेत्रातील भक्कम पाया त्यांनी घातला. जगाने नेहरूंचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे नेहरू आणि मोदी यांची तुलना करणे म्हणजे इतिहासाचा अपमान आहे.

दरम्यान, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या कथित विधानावरूनही सपकाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “ऑपरेशन ब्ल्यू स्टारबाबत केलेले विधान देशाच्या एकता आणि अखंडतेला धक्का देणारे असून ते खलिस्तान समर्थक आणि दहशतवादाला खतपाणी घालणारे आहे,” असा आरोप त्यांनी केला.

Sudhir mungantiwar : संकटाशी झुंजणाऱ्या ३ वर्षीय चिमुकलीसाठी मुनगंटीवार ठरले आधारवड; एम्समध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

“भारताच्या लष्कराचा, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बलिदानाचा आणि देशाच्या सार्वभौमत्वासाठी झालेल्या संघर्षाचा हा अपमान आहे. अशा राष्ट्रविरोधी विधानाबद्दल गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून तसेच भाजपमधून हकालपट्टी करण्यात यावी,” अशी मागणीही सपकाळ यांनी केली.

सपकाळ यांच्या या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे असून मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळावरून आणि गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस-भाजप संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!