व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या निवडणूक कार्यालयावर इंडिया आघाडीची धडक; बॅरिकेड्स तोडणाऱ्या राहुल आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी...

निवडणूक कार्यालयावर इंडिया आघाडीची धडक; बॅरिकेड्स तोडणाऱ्या राहुल आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, एसआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधकांचा एल्गार

New delhi मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, एसआयआर रद्द करणे आणि आगामी सर्व निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागण्यांसाठी सोमवारी राजधानी दिल्लीत विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीने जोरदार एल्गार पुकारला. संसद भवन ते मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात १९ विरोधी पक्षांचे सुमारे १५० खासदार व वरिष्ठ नेते रस्त्यावर उतरले होते.

निवडणूक आयोग कार्यालयाकडे जाणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून पुढे घुसण्याचा प्रयत्न केला असता काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘व्होट चोर, गद्दी चोर’ अशा जोरदार घोषणाबाजीने दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या कारवाईमुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

पाणी कपात करायचीच होती तर ३८ हजार कोटींचा ‘उपसा’ कशाला?

महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या खासदारांनी या मोर्चात सक्रीय सहभाग नोंदवला. यापूर्वी एसआयआरच्या विरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि ठाकरे बंधूंनी मुंबईत आंदोलने केली आहेत. दिल्लीतील या कारवाईच्या निषेधार्थ आता ८ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या पुढाकाराने भव्य राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे.

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे !

इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाचा मुद्दा प्रामुख्याने हाती घेतला आहे. बिहार आणि बंगालची निवडणूक निवडणूक आयोगाच्या सहकार्याने भाजपने जिंकली. लाखो मतदारांची नावे मतदार याद्यांमध्ये घुसाडली. आता ती नावे कपात केली जात आहे. मतदार याद्यांमध्ये कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे याचा निर्णय भाजपचे नेते घेत आहेत असा आरोप इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. आता आमचा ज्ञानेशकुमार आणि ईव्हीएमवर विश्वास राहिला नाही, त्यामुळे दोघांनाही हद्दपार करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

error: Content is protected !!