व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Khadakpurna dam : १६ गावांच्या पाण्याची फाईल २० वर्षांत मंत्रालयात पोहोचलीच नाही

Khadakpurna dam : १६ गावांच्या पाण्याची फाईल २० वर्षांत मंत्रालयात पोहोचलीच नाही

Water supply file for 16 villages never reached the Mantralaya even after 20 years : आमदाराचा दावा, हाकेच्या अंतरावर खडकपूर्णा धरण, तरी दोन दशकांपासून तहान कायम

Deulgaoraja तालुक्यातील संत चोखासागर खडकपूर्णा धरण अगदी हाकेच्या अंतरावर असतानाही परिसरातील तब्बल १६ गावे पाण्यासाठी दोन दशकांपासून संघर्ष करत आहेत, हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पाण्याचा आणि शेतकऱ्यांच्या काळ्या आईचा प्रश्नही गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप होत आहे.

या गंभीर प्रश्नासाठी अनेकदा धरणे, आंदोलने, उपोषणे आणि चक्काजाम आंदोलन झाले; मात्र निर्णय प्रक्रियेला गती मिळाली नाही. यावर बोलताना सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी धक्कादायक खुलासा करत सांगितले की, “गेल्या २० वर्षांत या १६ गावांच्या पाणी योजनेची फाईल मंत्रालयापर्यंत पोहोचलीच नाही.”या प्रश्नासाठी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, डॉ. रामप्रसाद शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव मुंडे यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय नेत्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र प्रशासकीय पातळीवर फाईलच पुढे न सरकल्याने प्रश्न कायम राहिला.

Operation lotus : ‘ऑपरेशन टायगर’नंतर ‘ऑपरेशन लोटस’, बुलढाण्यात खळबळ

या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवणी आरमाळ येथील कैलास नागरे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. तसेच शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांनीही १६ गावांच्या पाण्याच्या प्रश्नावर चक्काजाम आंदोलन छेडत हा मुद्दा राज्यपातळीवर नेला होता. १२ एप्रिल रोजी या विषयावर झालेल्या चर्चेनंतर १३ एप्रिलचे नियोजित चक्काजाम आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Buldhana Politics : विरोधकांमुळे विकासकामांत अडथळा, सत्ताधारी विरोधकांवर उलटले!

त्यानंतर या प्रश्नाबाबत खुलासा करताना आ. कायंदे म्हणाले की, “अनेक मोर्चे आणि आंदोलने झाली, पण प्रशासकीय स्तरावर फाईल पुढे सरकलीच नव्हती. मी आमदार झाल्यानंतर या विषयाला प्राधान्य दिले असून, आता वर्षभरात हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.”खडकपूर्णा धरणातून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!