Nagpur District Collector Dr. Vipin Itankar informed that the undertaking will be taken from those whose names are in the two lists : मतदार याद्यांमधील पुनरावृत्ती रोखण्यासाठी नवा नियम लागू
Nagpur : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाचीही तयारी पूर्ण झाली आहे. एकूण साडेचार हजार अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली. या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील १५ नगर परिषदा आणि १२ नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे.
या निवडणुकीमध्ये नागपूर जिल्ह्यातील एकूण ३७४ प्रभागांतून ५४६ सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी २७ निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी कार्यरत असतील. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सुसज्ज पथक नेमण्यात आले आहेत. तसेच मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
Gulabrao Patil : “बताओ कलेक्टर बडा है या गुलाबराव पाटील बडा है?”
डॉ. इटनकर यांनी सांगितले की, मतदार याद्यांमध्ये नावांच्या पुनरावृत्तीच्या तक्रारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. ज्या मतदारांचे नाव दोन किंवा अधित मतदार याद्यांमध्ये आढळेल, त्यांच्या नावासमोर दोन स्टार लावण्यात येतील. अशा मतदारांनी कोणत्या केंद्रावर मतदान करायचे आहे, याची स्पष्ट नोंद आधीच करावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. दोन किंवा अधिक ठिकाणी नाव असणाऱ्या मतदारांकडून हमीपत्र घेतले जाणार आहे. त्या हमीपत्रात त्यांना फक्त एका केंद्रावर मतदान करणार असल्याची खात्री द्यावी लागेल. हमीपत्र दिल्यानंतरच संबंधित मतदाराला मतदानाचा अधिकार मिळेल.
Ladki bahan Yojana : ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या हाती फक्त १२ दिवस
निवडणूक काळात मतदान केंद्रांवर सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवण्यात येणार आहे. अनेक संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीन्सच्या तपासणीपासून ते मतदान कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Parth Pawar : अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार जमीन घोटाळ्यात अडकले?
निवडणुकीच्या तारखा जवळ आल्याने सर्व राजकीय पक्षांनी प्रचारकार्याला वेग दिला आहे. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष आणि शांततेत पार पडावी, हा जिल्हा प्रशासनाचा हेतू स्पष्ट असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले.








