व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Elections : ‘क्रॉस वोटिंग’ची चलती! निकाल कोणाच्या पारड्यात?

Local Body Elections : ‘क्रॉस वोटिंग’ची चलती! निकाल कोणाच्या पारड्यात?

Rise in cross-voting, Whose side will the result favour? : ‘लक्ष्मीदर्शन’पासून नाराजीपर्यंत रंगले राजकीय समीकरण

Khamgao नगरपरिषद निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले असले, तरी मतदानानंतर शहरातील राजकीय चर्चांना ताप आला आहे. मोठ्या प्रमाणात ‘क्रॉस वोटिंग’ झाल्याची जोरदार चर्चा असून, अनेक उमेदवारांचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरच्या मतमोजणीकडे लागले आहे.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर मोठ्या संख्येने इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र, निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नवख्या चेहऱ्यांना दिलेल्या संधीमुळे पक्षांतर्गत नाराजी उसळली. काही प्रभागांत जातीय समीकरणांमध्ये ताण निर्माण झाला, आणि त्यातच एकाच समाजातील अनेक उमेदवार मैदानात आल्याने मतदारही गोंधळले. यामुळे मतदान जातीय समीकरणावर आधारित होते की पक्षनिष्ठेवर? यावर संभ्रम निर्माण झाला आणि परिणामी मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याचे निरीक्षण आहे.

F-class land converted into private : एफ-क्लास जमीन ‘खाजगी’ करण्यात आली?

काही प्रभागांमध्ये निवडणुकीच्या तोंडावर ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एकाच भागात वेगवेगळ्या हातून हा ‘दर्शन’प्रकार झाल्याने मतदारांची गफलत झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. उशिरा मैदानात उतरलेले काही उमेदवारही मतदानातील या गोंधळाचा फायदा घेत बाजी मारू शकतात, असेही वर्तवले जात आहे.

पक्षनिष्ठा दाखवत असले तरी काही नाराज कार्यकर्त्यांकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांना गुप्त पाठिंबा दिल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर, नगराध्यक्ष पदासाठी एक आणि प्रभागांसाठी दोन अशी तीन मते देण्याची पद्धत क्रॉस वोटिंगचे प्रमाण अधिक वाढवणारी ठरली आहे.

Terror of wild animals : सारोळापीर शिवारात मृत बिबट्या आढळल्याने खळबळ

अनेक तर्क-वितर्क, अंदाज, चर्चांना पूर्णविराम देत खरे राजकीय चित्र २१ डिसेंबरच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. क्रॉस वोटिंगचा फटका कोणाला बसतो आणि कोणाचे पारडे जड होते, याकडे आता खामगावकरांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!