व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Mahayuti : महायुतीत महामंडळांच्या खुर्च्यांसाठी जोरदार हालचाली

Mahayuti : महायुतीत महामंडळांच्या खुर्च्यांसाठी जोरदार हालचाली

mahayuti-mahamandal-vatap-formula-devendra-fadnavis-bjp-shivsena-ncp-corporation-allocation : फडणवीसांचा ‘48-29-23’ फॉर्म्युला निश्चित, महिन्याभरात मोठा निर्णय

Mumbai : राज्यातील महायुती सरकारकडून बहुप्रतिक्षित महामंडळ वाटपाची प्रक्रिया अखेर अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांना महामंडळांचे वाटप लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्तास्थापनेनंतर अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या वाटपाकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक नेते व पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते. आता पुढील महिनाभरात या प्रक्रियेवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुती सरकारने महामंडळ वाटपासाठी ‘48-29-23’ चा फॉर्म्युला निश्चित केला आहे. त्यानुसार भाजपला 48 टक्के, शिवसेनेला 29 टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेसला 23 टक्के महामंडळांमध्ये प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणते महामंडळ जाणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Sharad pawar : शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं जाहीर कौतुक

महायुतीच्या पुढील बैठकीत महामंडळांवरील सदस्य आणि अध्यक्षपदांच्या वाटपाबाबत चर्चा होणार असून त्यानंतर तिन्ही पक्षांकडून इच्छुकांची नावे निश्चित केली जातील. राज्यातील अनेक महत्त्वाच्या महामंडळांवर नियुक्ती मिळवण्यासाठी सध्या पडद्यामागे मोठ्या प्रमाणावर लॉबिंग सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे. महायुतीतील अनेक माजी आमदार, पराभूत उमेदवार आणि पक्षनिष्ठ पदाधिकारी या नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही महायुतीमध्ये जागावाटपाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. एका जागेवर पोटनिवडणूक होणार असल्याने एकूण 17 जागांसाठी राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या यावर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये सध्या खलबतं सुरू आहेत.

Legislative election : विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच, काँग्रेसची २२ मे रोजी मुंबईत बैठक

विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महामंडळ वाटपाला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राज्यातील सत्ताधारी राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. विविध महामंडळांच्या अध्यक्षपदांसाठी आणि सदस्यपदांसाठी इच्छुकांकडून आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली असून महायुतीतील अंतर्गत समीकरणे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत.

error: Content is protected !!