Congress to hold important meeting in Mumbai on 22nd May for legislative election: भाजपकडे 150, काँग्रेसकडे 120 मतदार; मित्रपक्षांचे वेट अँड वॉच
Amravati विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून, काँग्रेसनेही आपला उमेदवार निश्चित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली २२ मे रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
पक्षीय बलाबलाचा विचार करता, भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक १५० मतदार आहेत, तर काँग्रेस १२० मतदारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ३३, युवा स्वाभिमानचे २६, प्रहारचे २१, शिंदेसेनेचे १८ आणि बसपचे ३ सदस्य आहेत. त्यामुळे महायुतीचे एकूण संख्याबळ २५१ वर पोहोचले आहे.
दुसरीकडे, काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या उद्धवसेनेचे २१ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ सदस्य गृहित धरल्यास महाविकास आघाडीची एकूण मतसंख्या १५२ इतकी होते. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जवळपास १०० मतांचे मोठे अंतर असल्याचे स्पष्ट होत आहे.
Chandrashekhar bawankule : विधान परिषदेची रणधुमाळी; ७५ टक्के संख्याबळ, तरीही तडजोडीची तयारी
भाजपमध्ये या मतदारसंघाचे यापूर्वी दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी पालकमंत्री Pravin Pote यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. तसेच भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचे नावही चर्चेत असून, महायुतीतील घटक पक्ष युवा स्वाभिमान त्यांना पाठिंबा देत असल्याची चर्चा आहे. याशिवाय आणखी काही इच्छुकांची नावे चर्चेत असून, येत्या काही दिवसांत उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसमध्ये अद्याप कोणत्याही उमेदवाराचे नाव अधिकृतरीत्या समोर आलेले नाही. पक्षाकडून आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सर्वसमावेशक संपर्क असलेल्या उमेदवाराचा शोध सुरू असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर २२ मे रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीला शहराध्यक्ष बबलू शेखावत, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
Water crisis : पाण्यासाठी वडनेर भोलजीकरांचा टाहो; ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा
दरम्यान, हा मतदारसंघ गेल्या चार निवडणुकांपासून भाजपच्या ताब्यात आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये प्रवीण पोटे यांनी विजय मिळवला होता, तर त्यापूर्वीच्या दोन निवडणुकांत भाजपचे तत्कालीन नेते जगदीश गुप्ता विजयी झाले होते. विशेष म्हणजे, प्रत्येक वेळी काँग्रेसने जोरदार लढत दिली असली तरी, तुलनेने चांगले संख्याबळ असूनही पक्षाला हा मतदारसंघ जिंकण्यात यश आलेले नाही.








