Manoj Jarange’s agitation to reach in Mumbai for the demand of maratha reservation: बावनकुळेंचे माघारीचे आवाहन; गणेशोत्सवात मुंबई ठप्प होण्याचा धोका
Mumbai मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे रणशिंग फुकणारे मनोज जरांगे-पाटील यांनी महायुती सरकारला दिलेला अल्टीमेटम संपल्याने, त्यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज १५ वा दिवस असून हजारो मराठा समर्थक मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईत अभूतपूर्व कोंडी निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याने राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.
१२ सप्टेंबरपर्यंत सर्व मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत धडक देण्याचा इशारा जरांगे यांनी दिला होता. तत्पूर्वी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली व विशेष शिबिरांद्वारे कुणबी प्रमाणपत्र वितरीत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, कोणत्याही पुराव्याशिवाय ‘सरसकट कुणबी प्रमाणपत्र’ देण्याच्या आपल्या मुख्य मागणीवर जरांगे अद्यापही ठाम आहेत, ज्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
Fastag one tag : फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता करता येणार पोर्ट
यापूर्वी मराठवाड्यातील चार नगरसेवकांची कुणबी जात प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने फेटाळल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. हा सरकारचा षडयंत्र आणि मराठ्यांची फसवणूक असल्याचा आरोप करत जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र संताप व्यक्त करत, आमच्यामुळेच शिंदे सेनेचे आमदार-खासदार निवडून आले, तरीही आमच्या पदरी फसवणूकच पडली, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.
Ratnakar Mahajan : काँग्रेसचा अभ्यासू आणि निष्ठावंत शिलेदार काळाच्या पडद्याआड
मुंबईत गणेशोत्सवादरम्यान अभूतपूर्व वर्दळ असते. रस्ते, आस्थापने आणि वाहतूक आधीच व्यस्त असताना लाखोंच्या संख्येने मराठा समर्थक मुंबईत धडकल्यास शहराचा बोजवारा उडण्याची भीती आहे. हे ओळखूनच महसूलमंत्री बावनकुळे यांनी, गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन करणे राज्याच्या आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या हिताचे नाही, असे सांगत जरांगे पाटील यांना आंदोलन स्थगित करण्याचे आवाहनात्मक साकडे घातले आहे. मात्र, जरांगे आपल्या भूमिकेवर अडून राहिल्याने मुंबईतील प्रशासनाची धाकधूक वाढली असून महायुती सरकारपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन करणे राज्याच्या दृष्टीने योग्य नाही, कायद व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते असे सांगून बावनकुळे यांनी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.








