Standing committee chairman Shivani dani presented first budget for municipal corporation in New tenure : शिवानी दाणी यांनी सादर केला मनपाचा ६,२०२ कोटींचा अर्थसंकल्प
Nagpur नागपूर शहरातील नगरसेवकांना वॉर्ड फंडाच्या रूपात आता २० लाखांऐवजी २५ लाख रुपये मिळणार आहेत. यासोबतच नागपूर शहराला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे, ‘जेन झी’ तरुण पिढीसाठी स्टार्टअप्स, तक्रार निवारण सेल, ‘माझा प्रभाग, व्हायब्रंट प्रभाग’, सुषमा स्वराज योजना आणि महापौर माहेर योजना अशा नव्या व आकर्षक योजनांची घोषणा यांनी आपल्या अर्थकसंकल्पातून केली.
नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी यांनी आज मनपाचा ६ हजार २०२ कोटी ४८ लाख रुपयांचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांसह दमदार आमदारांच्या या शहरात अर्थसंकल्प सादर करताना शिवानी दाणी यांनी आपले वेगळेपण कायम राखले आहे. त्यांनी जाहीर केलेल्या विविध विकासकामांना आर्थिक बळ देतानाच, प्रत्येक नागरिकाशी थेट संपर्क ठेवण्याचे भाजपचे धोरण या अर्थसंकल्पातून अधोरेखित केले आहे.
यातूनच महापौर परिषद, स्थायी समिती सभापती परिषद, माहेशवाशिनींचा सत्कार, चौकाचौकांमध्ये संगीत सभा, तसेच स्ट्रीट व हेल्दी फूड योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. सोबतच सेवांचे डिजिटायझेशन, डेटा सेंटर, आधुनिक मत्स्यालय, तसेच मारबत आणि सावजी बुनकर महोत्सव अशा नव्या उपक्रमांमुळे या बजेटमध्ये नागपूरच्या सांस्कृतिक आणि आधुनिक रूपाचा सुरेख संगम पाहायला मिळत आहे. विकास कामांसाठी सातत्याने होणारी वृक्षतोड आणि पर्यावरणाचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शहरात ५ लाख झाडे लावून नागपूरला अधिक हरित करण्याची घोषणाही त्यांनी केली.
Mpsc new pattern : एमपीएससीचा ऐतिहासिक निर्णय! आता वर्षातून तीन वेळा संधी
एकूण ६ हजार २०२ कोटी ४८ लाखांच्या या अर्थसंकल्पात सर्वात मोठा वाटा वस्तू व सेवा कर (GST) आणि विशेष शासकीय अनुदानाचा (६०० कोटी) आहे. महापालिकेला नव्या निव्वळ उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यात फारसे यश आलेले नसून जलप्रदाय (२८५ कोटी), नगररचना (५४६ कोटी), मालमत्ता कर आणि बीओटी (BOT) प्रकल्प (६० कोटी) हेच पारंपरिक स्रोत महापालिकेचे कायम आहेत. मात्र, नागपुरात वेगाने विकसित होत असलेल्या ‘ऑरेंज स्ट्रीट’ प्रकल्पाकडून महापालिकेला मोठ्या महसुलाची अपेक्षा आहे. या प्रकल्पातून आतापर्यंत ८० कोटींचा महसूल मिळाला असून, येत्या ५ वर्षांत ६०० कोटी आणि प्रकल्प पूर्ण झाल्यावर तब्बल २५०० कोटी रुपये मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवरही मोठा भर देण्यात आला असून, नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता ९०० कोटींचा चौथा टप्पा हाती घेतला जाणार आहे. तसेच शहरात १०० नवे क्लीन स्ट्रीट फूड हब विकसित केले जातील. नितीन गडकरी यांनी २०० क्रीडा मैदानांचा विकास करण्याचे उद्दिष्ट महापालिकेला दिले असून, देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पहिल्या टप्प्यात ७५ क्रीडांगणे आधी विकसित केली जाणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘नागनदी शुद्धीकरण व बोटिंग प्रकल्पा’साठी १९२६ कोटी ९९ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. यामध्ये केंद्र सरकार १११५ कोटी आणि राज्य सरकार ५०७ कोटी रुपये देणार असून, महापालिकेला आपल्या हिश्श्याचे २० टक्के म्हणजेच ३०४ कोटी रुपये उभे करायचे आहेत. या निधीसाठी महापालिकेने ‘बॉण्ड’ (Bonds) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत ५२० किमी लांबीच्या सिव्हर लाईन्स बदलण्यात येणार असून, ९२ दलघमी क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्र आणि ७ नवीन पंपिंग स्टेशन उभारले जातील. नागनदीसोबतच पोहरा नदीच्या स्वच्छतेसाठीही बॉण्ड काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Raj Thackeray : ‘विश्वास नांगरे पाटील भरकटले’; राज ठाकरेंचा थेट निशाणा
मागील काही वर्षांपासून शहरातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत बजेटमध्ये काही उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची जुनीच योजना असली, तरी यावेळी १ लाख लीटरपेक्षा अधिक पाण्याचा वापर करणाऱ्या ग्राहकांना ट्रिटमेंट प्लांट बसवण्याची कडक ताकीद देण्यात आली आहे. भूजल पातळीत वाढ व्हावी याकरिता महापालिकेच्या इमारती आणि उद्यानांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे हाती घेतली जाणार आहेत. रस्त्यालगत २०९ ठिकाणी जमिनीत पाणी मुरवण्याची व्यवस्था केली जाणार असून, यापुढे रेन वॉटर हार्वेस्टिंग संपूर्ण शहरभर अनिवार्य केले जाणार आहे. याशिवाय घनकचरा व्यवस्थापन, शहराची स्वच्छता, सार्वजनिक शौचालये आणि ‘पे अँड पार्क’ आदी योजना पूर्ववत सुरूच ठेवल्या जाणार आहेत.








