व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण NCP Buldhana : राष्ट्रवादीतील नाराजी शमवण्याचा प्रयत्न; पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे राजीनामे पक्षाकडून अस्वीकृत

NCP Buldhana : राष्ट्रवादीतील नाराजी शमवण्याचा प्रयत्न; पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे राजीनामे पक्षाकडून अस्वीकृत

Attempt to quell discontent in NCP; resignations of office-bearers and workers rejected by the party : ‘योग्य वेळी योग्य संधी मिळेल’; नाराज पदाधिकाऱ्यांना नाझेर काझींचा दिलासा

Sindkhedraja विधानपरिषद निवडणुकीत पक्षाकडून संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेले सामूहिक राजीनामे पक्षश्रेष्ठींनी फेटाळून लावले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय व प्रदेश नेतृत्वाच्या निर्देशानुसार हे राजीनामे अस्वीकृत करण्यात आले असून, नाराज पदाधिकाऱ्यांना भविष्यात योग्य संधी दिली जाईल, अशी ग्वाही पक्षाचे अल्पसंख्यांक विभाग प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी दिली.

सिंदखेडराजा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काझी यांनी सांगितले की, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांचे अधिकृत पत्र प्राप्त झाले असून, त्यात राष्ट्रीय नेतृत्व व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचे नमूद आहे. पक्षसंघटनेसाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना आगामी काळात संघटनेत योग्य स्थान व संधी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Irregularities in grampanchayat : दहीहंडा ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार, उच्चस्तरीय चौकशी करा

नाराजीनंतर संघटनात्मक पातळीवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी पक्षाने समन्वयाची भूमिका घेतल्याचे संकेत या निर्णयातून मिळत आहेत. “कोणीही नाराज न होता पक्षसंघटनेचे काम अधिक जोमाने सुरू ठेवावे,” अशा सूचना वरिष्ठ नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे काझी यांनी सांगितले.

मातृतीर्थ सिंदखेडराजा शहराच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत काझी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले. शहराचा सर्वांगीण विकास अपेक्षित गतीने झालेला नसून, मोठे प्रकल्प अद्याप मार्गी लागले नसल्याची वस्तुस्थिती त्यांनी मान्य केली. प्रलंबित विकासकामांबाबत लवकरच सर्व संबंधित घटकांची बैठक घेण्यात येणार असून, राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Diesel shortage : डिझेल टंचाईविरोधात शेतकऱ्यांचा संताप; मेरा चौकीवर दोन तास रास्तारोको, महामार्ग ठप्प

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण व मनोज कायंदे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे काझी यांनी सांगितले. सिंदखेडराजा शहरासह जिल्हा दौऱ्याचे निमंत्रण देण्यात आले असून, त्यांनी ते स्वीकारल्याचा दावा करत या दौऱ्यामुळे स्थानिक विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!