व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Neet paper leak : नीट पेपर लीक माफिया आणि धर्मेंद्र प्रधान यांचे...

Neet paper leak : नीट पेपर लीक माफिया आणि धर्मेंद्र प्रधान यांचे संबंध काय?

Congress spokesperson Dr. Shama Mohamed raises doubts over an alleged connection between the NEET paper leak mafia and Dharmendra Pradhan : काँग्रेस प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांचा नागपुरात थेट हल्ला

Nagpur केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) ढिसाळ कारभारामुळे देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पेपर लीक माफियांचे नक्की संबंध काय? असा थेट आणि अत्यंत घणाघाती सवाल काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी आज नागपुरात केला.

प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या असंवेदनशीलतेवर ‘ कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात आल्यापासून बिहार, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानसारख्या भाजपशासित राज्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. मूळात लोकशाही देशात सरकारचे आपल्या जनतेप्रती उत्तरदायित्व असते, मात्र मोदी राजवटीत देशात लोकतंत्र उरले आहे का? ‘न्यूज लाँड्री’च्या अहवालानुसार गेल्या १० वर्षांत आपल्या देशात तब्बल ७९ वेळा पेपर फुटीच्या घटना घडल्या असून यामुळे देशातील ६ कोटी विद्यार्थी भरडले गेले आहेत, हा काही लहान आकडा नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

नुकत्याच झालेल्या ‘नीट’ परीक्षेतील महाघोटाळ्यावर बोलताना डॉ. शमा मोहम्मद म्हणाल्या की, ३ मे रोजी झालेली परीक्षा १२ मे रोजी शिक्षण मंत्र्यांनी एका झटक्यात रद्द केली. मी स्वतः डॉक्टर असल्याने वैद्यकीय प्रवेशासाठीच्या या परीक्षेची काठिण्यपातळी मला माहीत आहे. परीक्षा संपल्याबरोबर प्रत्येक विद्यार्थी गुणांची आकडेमोड करत आशेने बसलेला असतो, मात्र धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील २५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची आशा धुळीला मिळवून त्यांना पुन्हा परीक्षा देण्याचे फर्मान सोडले. या मानसिक तणावातून आणि नैराश्यातून देशातील १९ निष्पाप विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून मम्मी-पप्पा मला माफ करा” म्हणून मुले जग सोडून जात असताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान मात्र आपल्या पदावर कायम आहेत, त्यांच्या मृत्यूला कोणीच जबाबदार नाही का? असा सवाल त्यांनी केला

Prakash ambedkar : काँग्रेसचे उमेदवार पळपुटे, महाविकास आघाडीचे विसर्जन; प्रकाश आंबेडकर यांनी डागली तोफ

१५ मे रोजी सीबीआयने पुण्यामधून अशा एका महिला आरोपीला अटक केली, जी थेट नीटच्या केमिस्ट्री पेपर सेटिंग पॅनेलची सदस्य होती. परीक्षा प्रक्रियेतील या भयंकर ढिसाळपणाला NTA आणि केंद्रीय शिक्षण मंत्री जबाबदार नाहीत का? २०२४ मध्ये संसदीय स्थायी समितीने ताशेरे ओढले असताना, तसेच एनटीएने घेतलेल्या १४ परीक्षांपैकी ५ परीक्षांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याचे माहीत असतानाही धर्मेंद्र प्रधान यांनी कोणतीही कारवाई का केली नाही? देशाच्या विद्यार्थ्यांसाठी अपयशाची साखळी ठरलेल्या ‘एनटीए’ ला तात्काळ बंद करा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

Sudhir mungantiwar : चंद्रपूरच्या प्रदूषणावर मुनगंटीवार आक्रमक, उद्योगांवर कारवाईचे मंत्र्यांचे संकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर एक शब्दानेही खेद व्यक्त केला नाही किंवा त्यांच्या पालकांप्रति संवेदना दाखवली नाही, अशी टीका करत डॉ. शमा मोहम्मद म्हणाल्या की, इस्रायल, अमेरिका, व्हेनेझुएला किंवा युकेमधील घटनांवर तात्काळ संवेदना व्यक्त करणारे पंतप्रधान स्वतःच्या देशातील प्रश्नांवर मात्र सदैव ‘मौन’ असतात. २०१४ पूर्वी काँग्रेसचे सरकार असताना विरोधकांनी नुसते आरोप केले तरी आमच्या रेल्वे किंवा इतर मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामे दिले होते. मात्र आज रोहित वेमूलाचा जीव गेला तरी स्मृती इराणींनी राजीनामा दिला नाही, रेल्वे अपघात झाले तरी अश्विनी वैष्णव पदावर आहेत, आणि पठाणकोट, पुलवामासारख्या दहशतवादी घटना घडूनही गृहमंत्री अमित शाह राजीनामा देत नाहीत. जगभर गाजणाऱ्या ‘एपस्टीन फाइल्स’मध्ये नाव आल्यानंतरही पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी पदावर आहेत. याउलट ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टारमर यांनी नुकताच २२ जून रोजी केवळ एका चुकीच्या राजदूताच्या नियुक्तीवरून पदाचा राजीनामा दिला, मग आपल्याकडे धर्मेंद्र प्रधान यांना अभय का? असा टोला त्यांनी हाणला.

नीट पेपरफुटीतील आरोपींनी एकेका विद्यार्थ्याकडून ४०-४० लाख रुपये घेतल्याचे वास्तव समोर आले असून या माफियांचे संबंध कोणाकोणाशी आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने बनलेला एक डॉक्टर रुग्णाचा जीव घेऊ शकतो आणि हा देशाच्या आरोग्याशी खेळ आहे, असे सांगत त्यांनी युपीएससीच्या परीक्षेतही हाच घोळ समोर आल्याचा आरोप केला. काँग्रेस पक्षाला पारदर्शकता हवी आहे आणि य…

error: Content is protected !!