व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Paper leak allegations : NEETनंतर MPSC भरतीही वादाच्या भोवऱ्यात

Paper leak allegations : NEETनंतर MPSC भरतीही वादाच्या भोवऱ्यात

mpsc-drug-inspector-paper-leak-allegations-whatsapp-chat-fda-complaint-investigation : औषध निरीक्षक परीक्षेत पेपरफुटीचे आरोप, पुराव्यांसह तक्रार दाखल

Mumbai : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, 22 मार्च 2025 रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सॲप्सवर व्हायरल झाली होती. काही उमेदवारांकडे परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिकेतील माहिती उपलब्ध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Sharad Pawar : ‘युवाशक्तीच्या एकजुटीचा हा विजय’

तक्रारीमध्ये काही उमेदवारांच्या गुणांमध्ये संशयास्पद वाढ झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच गुणपत्रिका आणि अंतिम निवड यामध्ये विसंगती असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणात संबंधित चॅट, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुरावे यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या आरोपांवर प्राथमिक भूमिका स्पष्ट केली आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, औषध निरीक्षक भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. प्राप्त झालेल्या तक्रारीतील सर्व बाबींची तथ्य पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सामाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले की, MPSC औषध निरीक्षक परीक्षा हा केवळ एका प्रश्नपत्रिकेचा विषय नसून हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आहे.

त्यांनी पुढे म्हटले की, जर परीक्षेपूर्वी काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचे आरोप खरे ठरले, तर तो अत्यंत गंभीर प्रकार आहे. एका प्रश्नपत्रिकेमागे हजारो विद्यार्थ्यांची वर्षानुवर्षांची मेहनत, पालकांचे कष्ट आणि त्यांच्या भविष्यातील स्वप्ने दडलेली असतात. काही मोजक्या लोकांच्या गैरप्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग

NEET प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास आधीच डळमळीत झाला असताना आता MPSC औषध निरीक्षक भरतीवरील आरोपांमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता पुन्हा चर्चेत आली आहे. या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी आणि विविध संघटनांकडून होत आहे. दरम्यान, चौकशी पूर्ण होईपर्यंत या प्रकरणाकडे राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!