व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Paratwada sexual exploitation case : बदनामीमुळे पीडित तरुणी शांत होती, आता सगळच...

Paratwada sexual exploitation case : बदनामीमुळे पीडित तरुणी शांत होती, आता सगळच सांगितलं!

15-year-old victim breaks her silence in the Paratwada sexual exploitation case : नागपूरहून आलेल्या १५ वर्षीय पीडितेने तोडले मौन; अमरावतीत बयान नोंद

Amravati परतवाडा येथील गाजत असलेल्या ‘व्हिडीओ कांड’ प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून, नागपूरहून आलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन पीडितेने अखेर मौन तोडले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) तिचे अधिकृत बयान नोंदवले. महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिला अमरावतीत आणण्यात आले होते.

या प्रकरणात व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओ आणि छायाचित्रांमुळे दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले होते. ग्रामीण पोलिसांनी पीडितांना पुढे येण्याचे आवाहन केले होते; मात्र भीती आणि बदनामीमुळे कोणीही समोर येत नव्हते. अशा स्थितीत पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नागपूरमधून या अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. ती मूळची नागपूरची आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी ती नागपूरहून बयानासाठी आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Mahayuti Government : महागाई वाढली मानधन वाढले, प्रवास भत्ताही वाढला!

या प्रकरणात आतापर्यंत आठ पीडित मुलींची ओळख पटली आहे. त्यापैकी एक असलेल्या या १५ वर्षीय मुलीच्या बयानामुळे पोक्सो कायद्यानुसार पुढील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिच्या बयानातील तपशीलांनुसार गुन्ह्यात नवीन कलमे जोडायची की स्वतंत्र गुन्हा दाखल करायचा, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी तपासात हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट केले. “एसआयटीचा तपास योग्य दिशेने सुरू असून, ग्रामीण पोलिसांचे काम कौतुकास्पद आहे. कुणाकडेही ठोस पुरावे असतील, तर ते तत्काळ तपास यंत्रणेकडे द्यावेत,” असे त्यांनी आवाहन केले. त्यांनी शनिवारी अमरावती पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन तपासाचा आढावा घेतला.

Bjp internal conflict : भाजपमध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध आयात नेते’ संघर्ष भडकला

“१५ वर्षीय पीडिता समोर आली असून, महिला पोलिस अधिकारी काही दिवसांपासून तिच्याशी संवाद साधत होत्या. समुपदेशनानंतर, महिला पोलिस अधिकारी आणि बाल कल्याण समितीच्या उपस्थितीत तिचे बयान नोंदवण्यात येत आहे,” अशी माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली.

error: Content is protected !!