Adv. Prakash Ambedkar demands assistance of ₹50,000 per hectare : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी
Akola अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संकटाला ‘महापूर नव्हे तर महाप्रलय’ असे संबोधत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारकडे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत, कर्जमाफी आणि इतर तातडीची मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ पिकच नाही, तर जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न, दिवाळीचे उत्पन्न आणि भविष्यातील आधार वाहून गेला आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर, लहानमोठे व्यावसायिक, कारागीर, बारा बलुतेदार आणि मागासवर्गीय समाजही मोठ्या प्रमाणावर बाधित झाला आहे.
Teacher’s constituency : बोगस नावांना आळा घालण्यासाठी मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा
आघाडीने स्पष्ट केले आहे की, राज्य सरकारने जाहीर केलेली २,२०० कोटींची मदत ही परिस्थितीच्या मानाने अत्यंत तुटपुंजी आहे. “कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात आलेला सेस आणि राज्याच्या सकल उत्पन्नातील कृषीचा वाटा नेमका शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कधी वापरला जाणार?” असा सवालही आघाडीकडून करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीने सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, मोठमोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ करताना किंवा त्यांना मदत करताना सरकार कोणतेही सर्व्हे अथवा पंचनामे करत नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र या औपचारिकता का पाळल्या जातात, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
“आज शेतकऱ्यांना कोरड्या घोषणा आणि खोटी आश्वासने नकोत; तर सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्यक्ष मदत करावी,” असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
Dhammachakra Pravartan Din : पहिल्याच दिवशी घेतली पाच हजार उपासकांनी दीक्षा !
मुख्य मागण्या
1. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.
2. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी.
3. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी.
4. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी.








