व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र PWD Contractor Commits Suicide : पी. व्ही. वर्मा आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे...

PWD Contractor Commits Suicide : पी. व्ही. वर्मा आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे !

P.V. Verma Suicide Case Handed Over to Crime Branch : पीडब्लूडी कंत्राटदार म्हणून कमावला होता चांगला लौकिक

Nagpur : शासकीय कंत्राटदार पी. व्ही. वर्मा यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून तणावातून १ सप्टेबर रोजी आत्महत्या केली. त्यानंतर कंत्राटदारांच्या संघटनांसह जनसामान्यांमध्येही हळहळ व्यक्त केली गेली. या आत्महत्येनंतर कंत्राटदारांनी थकीत देयके शासनाने तात्काळ द्यावी, ही मागणी पुन्हा जोरकसपणे लाऊन धरली आहे. या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी हे आदेश दिले.

पी. व्ही. वर्मा यांची ५० कोटी रुपयांची देयके शासनाकडे प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. पण एका कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार त्यांची तब्बल १०० कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. यामुळेच त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता आणि ते तणावग्रस्त राहायला लागले. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलजीवन मिशन व इतर विभागाच्या कंत्राटदारांची थकीत बिले मंजूर करण्याची मागणी आहे.

Devendra fadnavis : कुणबी प्रमाणपत्राबाबत सरकारची स्पष्ट भूमिका

सर्व कंत्राटदारांची मिळून शासनाकडे तब्बल ९० हजार कोटी रुपयांची बिले थकीत असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. पी. व्ही. वर्मा हे नागपुरात राज नगर भागात राहात होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार म्हणून त्यांनी चांगला नावलौकिक मिळवला होता. दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेता प्रभास यांचे ते मेहुणे लागत होते. गेल्या आठवड्यात नागपूरच्या संविधान चौकात सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांनी सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनातही पी. व्ही. वर्मा सहभागी झाले होते.

error: Content is protected !!