व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण राज ठाकरे येत आहेत, शेतकऱ्यांना मदत करा; मनसेचा प्रशासनाला इशारा

राज ठाकरे येत आहेत, शेतकऱ्यांना मदत करा; मनसेचा प्रशासनाला इशारा

अकोला दौऱ्याची तयारी सुरू; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलनाचा एल्गार

Akola महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आगामी नियोजित अकोला जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाने तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात मनसेची आढावा बैठक अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात नुकतीच पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बांधणीसह जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मनसेने प्रशासनाला दिला.

मनसेचे राज्य सरचिटणीस तथा अकोला जिल्हा संपर्क अध्यक्ष हेमंत गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. आगामी काळात राज ठाकरे यांच्या होणाऱ्या अकोला दौऱ्याच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

रोहित पवारांच्या वक्तव्यावरून दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने!

संघटनेची ताकद वाढविण्यासाठी तालुका, शहर, शाखा आणि बूथ पातळीवर संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे, सदस्य नोंदणी मोहीम राबविणे आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावी करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले.

५४ मतांनी पराभूत झालेले परिसीमन विधेयक २२४ दिवसांनी पुन्हा संसदेत!

बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवरही गंभीर चर्चा झाली. पावसाअभावी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न यावर चिंता व्यक्त करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने चारा-पाण्याची व्यवस्था करावी, यासाठी मनसेकडून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळाली नाही, तर मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

error: Content is protected !!