Vijay Wadettiwar should avoid politics in farmers issue : ग्रामीण भागातीत लोकप्रतिनिधींना प्रवास भत्ता व इतर व्यवस्था करायची असते
Nagpur : काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला आमदारकीचे सहा महिन्याचे वेतन देण्याची घोषणा केली. सर्वपक्षीय आमदारांनीही शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्याला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
नागपुरात माध्यमांशी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले, विजय वडेट्टीवार यांनी सहा महिन्यांचे वेतन दिले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण राजकारण म्हणून या सगळ्या गोष्टी करणे योग्य नाही. भाजपच्या सर्व आमदार व खासदारांनी एका महिन्याचे पूर्ण वेतन आपत्तीग्रस्तांना देण्याचे ठरवले आहे. ग्रामीण भागात असणाऱ्या लोकप्रतिनिधींना मिळणारे वेतन हे त्यांना प्रवास भत्त्यासाठी मिळत असते. काही लोकप्रतिनिधी गडगंज असतात. पण ग्रामीण भागातील सर्वच लोकप्रतिनिधी तसे नसतात.
Chandrashekhar Bawankule : मंडळ अधिकाऱ्यामुळे नुकसान झाले असेल तर फौजदारी कारवाई निश्चित !
महाराष्ट्रात सरकार मायबाप म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सर्व आवश्यक ती मदत सरकार शेतकऱ्यांना करणार आहे. महायुती सरकार राज्याच्या सर्व भागांमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांकडून पाहणी करवून घेणार आहे. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू करण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आवश्यक त्या ठिकाणी जाऊन मदतकार्य करत आहेत. अशी वेळ कुणावर येऊ नये. पण मदत करण्याची भावना सगळ्यांची असली पाहिजे, असेही रविंद्र चव्हाण म्हणाले.








