व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Gaikwad : ‘तुटवडा नाही’च्या दाव्याने बुलढाण्यात राजकारण तापले!

Sanjay Gaikwad : ‘तुटवडा नाही’च्या दाव्याने बुलढाण्यात राजकारण तापले!

Political Allegations Between the Ruling Party and the Opposition Over Fuel Availability : इंधन उपलब्धतेवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; प्रत्यक्ष परिस्थिती आणि दाव्यांतील तफावतीची चर्चा

Buldhana जिल्ह्यात इंधन तुटवड्याच्या चर्चेने आता राजकीय स्वरूप धारण केले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ग्रामीण भागात शेतकरी डिझेलसाठी पेट्रोल पंपांवर रांगा लावत असल्याचे चित्र समोर येत असतानाच, आमदार संजय गायकवाड यांनी जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा नसल्याचा दावा केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पेरणीपूर्व शेतीकामे सुरू होत असताना डिझेलची मागणी वाढली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी डिझेलसाठी प्रतीक्षा करत आहेत. मात्र, प्रशासन आणि सत्ताधारी नेते परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करीत आहेत. यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती आणि राजकीय दाव्यांमध्ये विसंगती असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Legislative Election : विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरले, ९९ टक्के जागावाटप निश्चित

या मुद्यावरून विरोधकांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका सुरू केली आहे. “इंधन पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केवळ कागदोपत्री असून ग्रामीण भागातील वास्तव वेगळे आहे,” असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर डिझेल न मिळाल्यास शेतीकामांवर परिणाम होऊ शकतो, असा मुद्दाही पुढे केला जात आहे.

Diesel crisis : मुख्यमंत्र्यांचे दावे खोटे, शेतकरी डिझेलसाठी रात्रंदिवस रांगेत

दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांकडून इंधन तुटवड्याच्या चर्चांना ‘अफवा’चे स्वरूप दिले जात असून कृत्रिम भीती आणि साठेबाजीच्या मानसिकतेमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी वाढल्याचा दावा केला जात आहे. पुरवठा सुरळीत असल्याने नागरिकांनी घाबरून जादा साठा करू नये, असे आवाहनही काही स्तरांतून केले जात आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील अनेक भागांत डिझेलसाठी लागलेल्या रांगा आणि नेत्यांकडून होत असलेले दावे यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परिणामी, “जिल्ह्यात डिझेलपेक्षा राजकीय वातावरणच अधिक पेटले आहे,” अशी मिश्किल चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

error: Content is protected !!