व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अजित पवारांना अटकेच्या धमक्या देऊन महायुतीत आणलं

अजित पवारांना अटकेच्या धमक्या देऊन महायुतीत आणलं

संजय राऊतांचा अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांवर घणाघात!

Mumbai : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या वादात उडी घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार यांच्या मृत्यूबाबत एफआयआर दाखल न होणे, विमान अपघाताच्या तपासातील कथित दिरंगाई आणि भाजपच्या जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ देत राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवार स्वखुशीने महायुतीत आले नव्हते, तर त्यांना ईडी, सीबीआय आणि अटकेच्या धमक्या देऊन महायुतीत आणण्यात आले, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

मुंबईत मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना खऱ्या असतील, तर त्यांच्या संशयास्पद विमान अपघात प्रकरणात अद्याप एफआयआर का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी केला. राज्याचे गृहमंत्री इतर प्रकरणांमध्ये तातडीने एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देतात, मग या प्रकरणात अशी भूमिका का घेतली जात नाही, अशी विचारणाही त्यांनी केली.

रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या ‘मफलर मॅन’च्या मुद्द्यालाही राऊत यांनी पाठिंबा दिला. संबंधित विमान कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मफलर परिधान करून उपस्थित असल्याचा फोटो रोहित पवार यांनी दाखवला होता. या छायाचित्रावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली. तसेच अजित पवार यांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे का दिला जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

अजित पवारांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले!

यावेळी राऊत यांनी अजित पवार आणि भाजपमधील जुन्या राजकीय संघर्षाची आठवण करून दिली. अमित शाह यांनी अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यातील ७० हजार कोटी रुपये तसेच जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कथित गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी अमित शाह यांनी त्यांची माफी मागायला हवी होती, असे राऊत म्हणाले.

अजित पवार महायुतीत स्वेच्छेने सहभागी झाले नव्हते, तर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून त्यांना महायुतीत आणण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला. भाजपचे राजकारण स्वार्थावर आधारित असल्याची टीका करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राजकारण तापले; काँग्रेसचा कडाडून विरोध, तर ‘इंडिया’ आघाडीत फुटीची शक्यता

दरम्यान, रोहित पवारांच्या आरोपांनंतर सत्यजीत तांबे यांनी संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता, तर भाजप नेत्यांनीही फडणवीसांच्या बचावासाठी भूमिका मांडली आहे. आता संजय राऊत यांच्या आक्रमक विधानांमुळे हा राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मात्र, विमान अपघातामागील नेमके कारण आणि या प्रकरणातील जबाबदारी अधिकृत तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!