Sharad Pawar Responds to Vikhe Patil, Maratha Reservation Dispute Set to Escalate : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून साखरेच्या आयातीपर्यंत केंद्रावर टीका
Mumbai : मराठा आरक्षणावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंडल आयोग लागू झाला तेव्हाच मराठ्यांना आरक्षण दिले असते तर आजचा असंतोष निर्माण झाला नसता, असा टोला विखे पाटलांनी लगावला होता. त्यावर पलटवार करताना, तुम्ही इतक्या वर्षांपासून सत्तेत आहात, मग तुम्ही आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही असा थेट सवाल शरद पवारांनी पत्रकार परिषदेत विचारला.
सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, यावरून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. यावर भाष्य करताना पवारांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सध्या यावर काहीही सांगणे योग्य ठरणार नाही.
Contractor Threat : ठेकेदाराला ‘विद्युत दाहिनीत जिवंत जाळण्याची’ भाषा, सभागृहात खळबळ
न्यायालयात ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी शिवसेना कशी बळकावली गेली आणि निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षांचे निर्णय कसे चुकीचे होते, हे मांडल्याने ठाकरे गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुसरीकडे, शिंदे गटाने न्यायालयात दावा केला आहे की, पक्षात आधीपासूनच मोठा असंतोष होता आणि घटनेत बदल करून उद्धव ठाकरेंकडे सर्वाधिकार देण्यात आले होते.
Mahayuti Tussle : तटकरेंनी किती ‘सरोगसी बाळांना’ जन्म दिला आणि नंतर…
पत्रकार परिषदेत शरद पवारांनी इतर महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरही भाष्य केले. दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करत त्यांनी केंद्राच्या धोरणांवर टीका केली. तसेच वाढलेले दुधाचे दर, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, मराठवाड्यातील दुष्काळ आणि साखरेचे दर वाढल्यानंतर केंद्र सरकारने साखरेच्या आयतचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ सप्टेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.








