व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Shivsena, trinmool congress : शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लवकरच फैसला?; सर्वोच्च न्यायालयाचे संकेत

Shivsena, trinmool congress : शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लवकरच फैसला?; सर्वोच्च न्यायालयाचे संकेत

Rapid developments in court over party symbol disputes; decision on Shivsena party symbol expected soon : पक्षचिन्हाच्या वादांवर न्यायालयात वेगाने घडामोडी; तृणमूलबाबत ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याचे आयोगाला निर्देश

New Delhi शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणाचे, यावर सर्वोच्च न्यायालयात जोरदार सुनावणी सुरू असतानाच आता तृणमूल काँग्रेसच्या गोठवलेल्या पक्षचिन्हाचा वादही उच्च न्यायालयात पोहोचला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील फुटीनंतर निवडणूक आयोगाने गोठवलेल्या पक्षचिन्हावर ऑक्टोबर महिन्यापर्यंत तातडीने निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायमूर्ती बागची यांनी निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या विलंबामुळे शिवसेनेत कसा पेच निर्माण झाला, याकडेही न्यायमूर्तींनी यावेळी लक्ष वेधले. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांच्या याचिका लवकरच निकाली निघणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला होता. या वादानंतर निवडणूक आयोगाने तृणमूलचे पक्षचिन्ह गोठवले असून, त्याविरोधात ममता बॅनर्जी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आयोगाच्या विलंबावर बोट ठेवत ऑक्टोबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले.

 

Krushna Khopde, Prafulla Gudadhe : गुडधेंकडून संघाची तुलना तालिबानशी; खोपडे म्हणतात, ‘काँग्रेसला बाबर चालतो का?’

दुसऱ्या बाजूला, निवडणूक आयोगाने आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिला होता. याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद पूर्ण करत ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरते गोठवण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. सध्या न्यायालयात शिंदे गटाच्या वतीने जोरदार युक्तिवाद सुरू असून, या महत्त्वाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येणे अद्याप बाकी आहे.पक्षचिन्हाच्या वादांवर न्यायालयात वेगाने घडामोडी: तृणमूलबाबत ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याचे आयोगाला निर्देश; शिवसेनेच्या धनुष्यबाणावरही लवकरच फैसला?

नवी दिल्ली: शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणाचे, यावर सर्वोच्च न्यायालयात जोरदार सुनावणी सुरू असतानाच आता तृणमूल काँग्रेसच्या गोठवलेल्या पक्षचिन्हाचा वादही उच्च न्यायालयात पोहोचला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील फुटीनंतर निवडणूक आयोगाने गोठवलेल्या पक्षचिन्हावर ऑक्टोबर महिन्यापर्यंत तातडीने निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायमूर्ती बागची यांनी निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या विलंबामुळे शिवसेनेत कसा पेच निर्माण झाला, याकडेही न्यायमूर्तींनी यावेळी लक्ष वेधले. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांच्या याचिका लवकरच निकाली निघणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Amit Shah, Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार हे तर अमित शहांचे ‘छोटा शकील’, संजय राऊतांचा थेट आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला होता. या वादानंतर निवडणूक आयोगाने तृणमूलचे पक्षचिन्ह गोठवले असून, त्याविरोधात ममता बॅनर्जी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आयोगाच्या विलंबावर बोट ठेवत ऑक्टोबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले.

दुसऱ्या बाजूला, निवडणूक आयोगाने आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिला होता. याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद पूर्ण करत ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह तात्पुरते गोठवण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. सध्या न्यायालयात शिंदे गटाच्या वतीने जोरदार युक्तिवाद सुरू असून, या महत्त्वाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येणे अद्याप बाकी आहे.

error: Content is protected !!