After resolving key issues in the Assembly, all eyes are now on Mungantiwar in the Winter Session : संपूर्ण राज्याचे लागलेय लक्ष, यापूर्वी सरकारकडे केलेल्या आग्रही भूमिकेतून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
Nagpur : विधानसभेत यापूर्वी अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांवर बुलंद आवाज करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे हिवाळी अधिवेशनात संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत त्यांनी उपस्थित केलेल्या विविध लोकहिताच्या विषयांना न्याय मिळाला असून, चालू अधिवेशनात ते कोणते मुद्दे जोरदारपणे मांडणार याबाबत जनतेसह सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही उत्सुकता आहे. सरकारसमोर ठाम, मुद्देसूद आणि तथ्यपूर्ण मांडणी करत लोकहिताच्या प्रश्नांना आक्रमक आणि तितकेच अभ्यासू शैलीतून प्रश्न मांडून निर्णय घेण्यासाठी भाग पाडणारे आ. मुनगंटीवार हे कायम चर्चेत असतात.
संसदीय आयुधांचा वापर करून लोकांच्या प्रश्नांना संवेदनशीलपणे आणि तितकेच आक्रमक होऊन अनेक मुद्द्यांवर शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी पुढे असतात. विधायक पर्याय सुचविण्याची तळमळ हे मुनगंटीवार यांच्या कारकीर्दीचे प्रभावी वैशिष्ट्य आहे. अनेक वेळा शासनाने दुर्लक्षित केलेल्या विषयांना त्यांनी अशासकीय विधेयकांच्या माध्यमातून चर्चेत आणले असून, त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक विषय मार्गी लागले आहेत.
Sudhir Mungantiwar : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘प्रतिहेक्टरी वीस हजार बोनस’ जाहीर करा !
विधानसभेच्या विद्यमान हिवाळी अधिवेशनात राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तब्बल ३७ अशासकीय विधेयके विचारार्थ ठेवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असूनही जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज बुलंद करणे ही त्यांची कार्यशैली ठसठशीतपणे समोर आली आहे. लोककल्याणाच्या मुद्यांवर लढा देताना आक्रमक व अभ्यासू भूमिका घेणारे मुनगंटीवार यांनी राज्याच्या संसदीय इतिहासात यापूर्वीही एका दिवशी ३० अशासकीय विधेयकांची पुनर्स्थापना करून विक्रम केला होता.
या विधेयकांमध्ये शेतकरी, विद्यार्थी, महिला, ग्रामविकास, पर्यावरण आणि सामाजिक समतोल यांसारख्या थेट सामान्यांच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या विषयांवर आधारित आहेत. अर्थपूर्ण विधानमंडळीन कामकाजाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांच्या न्याय्य हक्कांना आवाज मिळवून देण्यासाठी या विधेयकांची मांडणी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
लोकांच्या प्रश्नांशी संवेदनशीलता आणि विधायक पर्याय सूचविण्याची तळमळ हे मुनगंटीवार यांच्या कारकीर्दीचे प्रभावी वैशिष्ट्य म्हणून अधोरेखित होत आहे. अनेक वेळा शासनाने दुर्लक्षित केलेल्या विषयांना त्यांनी अशासकीय विधेयकांच्या माध्यमातून चर्चेत आणले असून, त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक मुद्द्यांवर शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडले आहेत.
लोकहितासाठी आग्रही भूमिका मांडत मुनगंटीवार यांनी, मागील अधिवेशनात ठळक कामगिरी केली यात, वाढत्या धर्मांतर प्रकरणांवर त्यांनी कडक कायदा करण्याची मागणी विधानसभेत मांडली; सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी दीर्घकाळाच्या मागणीनंतर हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस जाहीर या संदर्भातील शासन निर्णय २५ मार्च रोजी जारी झाला. मिनिमम सपोर्ट प्राईस (MSP) अंतर्गत धान खरेदी उद्दिष्ट चंद्रपूरसाठी ९०,६८० वरून १,९०,६८० क्विंटलपर्यंत वाढविण्यात त्यांच्या पाठपुराव्यामुळे यश. कोरोमंडल इंटरनॅशनलद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण उघड केल्यानंतर त्यांच्या तक्रारीनंतर कंपनीविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल.
Sudhir Mungantiwar : मुल जाहिरसभेत मुनगंटीवारांचा काँग्रेसवर हल्लाबोल !
सौर पॅनेल बसविल्यानंतर नेट मीटरिंग केवळ दिवसापुरते मर्यादित करण्याच्या निर्णयाला कडक विरोध नागरिकांच्या हितासाठी ऊर्जा विभागाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी. पोंभुर्णा एमआयडीसीसाठी २००९ पासून सातत्याने मागणी यंदा अधिवेशनात अखेर एक वर्षात सुरू करण्याचे सरकारचे स्पष्ट आश्वासन. पाच कृषी न्यायालये आणि एग्रीकल्चर ऑफिस पिन स्थापनेची मागणी शेतकऱ्यांवरील फसवणूक रोखण्यासाठी ठोस कायदेबाबत प्रभावी पाठपुरावा. मुल बस आगाराला कामाची गती परिवहन मंत्र्यांसमवेत मुंबईतील बैठकीत ठोस प्रगती. अशा अनेक लोककल्याणकारी निर्णयाला त्यांनी अधिवेशनातून मार्ग काढला.
बल्लारपूर विधानसभेसाठी १६७ कोटींच्या अभूतपूर्व मंजुरी नंतर विकासाचा नवा टप्पा, सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या ८ कामांपैकी तब्बल ५ कामे एकट्या बल्लारपूर विधानसभेला मिळाली. यामध्ये म…








