व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vaishali Nagawade : रुपाली चाकणकरांनंतर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीची धुरा वैशाली नागवडेंकडे

Vaishali Nagawade : रुपाली चाकणकरांनंतर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीची धुरा वैशाली नागवडेंकडे

ncp-appointed-vaishali-nagawade-as-maharashtra-women-state-president-after-rupali-chakankar : निखिल ठाकरे यांच्याकडे युवकचे प्रदेशाध्यक्षपद, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिला संघटनेच्या नेतृत्वात मोठा बदल करत वैशाली नागवडे यांची महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बुधवारी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याचवेळी निखिल ठाकरे यांच्याकडे युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही नेत्यांना नियुक्तीपत्र प्रदान करत नव्या जबाबदाऱ्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे महिला संघटनेचे नेतृत्व रिक्त झाले होते. त्यानंतर पक्षाने अनुभवी आणि संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असलेल्या वैशाली नागवडे यांच्यावर विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
वैशाली नागवडे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी पंचायत समिती सदस्य, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या अध्यक्षा तसेच विविध संस्थांमध्ये संचालक म्हणून काम केले आहे. ग्रामीण भागातील संघटन बांधणी आणि महिला नेतृत्व उभे करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
पुण्यातील एस. पी. महाविद्यालयातून बी.कॉमचे शिक्षण घेतलेल्या वैशाली नागवडे यांनी २००२ ते २००५ या कालावधीत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर महानंद दूध महासंघ, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट यांसारख्या संस्थांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Nirmal Urban : नागपूरच्या निर्मल अर्बन बँकेत राडा; संस्थापक अध्यक्षांवरच ४० कोटींच्या कर्जाचा ठपका

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना वैशाली नागवडे म्हणाल्या, “गेल्या २६ वर्षांच्या राजकीय प्रवासात पक्षाने मला विविध जबाबदाऱ्या दिल्या. पंचायत समिती सदस्यापासून महानंदच्या अध्यक्षा आणि पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदापर्यंत काम करण्याची संधी मिळाली. आता महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाची विचारधारा आणि दादांची ‘कामाचा माणूस’ ही ओळख अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.”
यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेवरही भाष्य केले. सुनेत्रा पवार यांनी मोठ्या वैयक्तिक दुःखातून बाहेर पडत जनसेवेची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांच्या भावनांचा आदर राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने केलेली टीका महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशी नसल्याची टीकाही त्यांनी केली.

Sunil Tatkare : पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदारांनी हस्तक्षेप टाळावा!

दरम्यान, युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निखिल ठाकरे यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संघटन हेच पक्षाचे खरे बळ असून कार्यकर्त्यांच्या साथीने युवक संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वैशाली नागवडे आणि निखिल ठाकरे यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटन विस्ताराच्या दृष्टीने मोठी रणनीती आखल्याचे मानले जात आहे. महिला आणि युवक संघटनांमध्ये नव्या नेतृत्वाला संधी देत पक्षाने भविष्यातील राजकीय समीकरणांची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

error: Content is protected !!