व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Water shortage : आठ महिन्यांपासून पाणीच मिळाले नाही, संतप्त महिलांचा अभियंत्याच्या कक्षात...

Water shortage : आठ महिन्यांपासून पाणीच मिळाले नाही, संतप्त महिलांचा अभियंत्याच्या कक्षात ठिय्या

Angry women stage a sit-in in the engineer’s office after not receiving water for eight months : मलकापुरात माजी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांच्या नेतृत्वात महिला आक्रमक

Malkapur शहरातील संत ज्ञानेश्वरनगर, सातव प्लॉट (प्रभाग क्र. १५) येथे गत आठ महिन्यांपासून पाणीपुरवठाच झाला नाही. पाठपुरावा करूनही पाणी मिळाले नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी नगर पालिका अभियंत्यांच्या कक्षातच ठिय्या आंदोलन केले. माजी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

तब्बल आठ महिन्यांपासून १५ ते २० कुटुंबांना नळाचे पाणी मिळत नसल्याने महिलांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. उन्हाच्या ४२ ते 45 अंश तापमानात महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. चांडक विद्यालय परिसरातील पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार धाव घेऊनही प्रश्न निकाली निघाला नाही.

Revenue department : मलकापूर पांग्रा मंडळातील १४ गावांचा एल्गार; साखरखेर्डा समावेशाला विरोध, सिंदखेडराजातच ठेवण्याची मागणी

स्थानिकांच्या मते, प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली गेली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी अखेर आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेत ठिय्या देत उपोषण सुरू केले. “जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असा इशारा अॅड. हरीश रावळ यांनी दिला आहे.

या आंदोलनात अनिल बगाडे, पांडुरंग जगताप, गोपाल कावस्कर, कमलबाई भोपळे, शोभाबाई वावगे, लताबाई ईसाळकर, जिजाबाई जगताप, मंजुळाबाई देविकार, शारदाबाई जगताप, लक्ष्मीबाई वायडे, सरलाबाई वायडे यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!