व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र sudhir mungantiwar : चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांची प्रभावी लढाई; शेतकऱ्यांसाठी प्रदूषणावर कडक प्रहार!

sudhir mungantiwar : चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांची प्रभावी लढाई; शेतकऱ्यांसाठी प्रदूषणावर कडक प्रहार!

Mungantiwar’s effective fight in Chandrapur; A tough blow to pollution for farmers! : राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज चंद्रपूरमध्ये सविस्तर पाहणी दौरा

चंद्रपूर: ऊर्जानगर परिसरातील कोळशाच्या धुळीचे प्रदूषण आणि शहरातील जीवनवाहिनी असलेल्या झरपट व इरई नद्यांची दुरवस्था या गंभीर प्रश्नांवर राज्य सरकारने आता ठोस पावले उचलली आहेत. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज चंद्रपूर जिल्ह्याचा सविस्तर पाहणी दौरा करून प्रदूषणावर ‘ठोस व कालबद्ध उपाययोजना’ करण्याचे आश्वासन दिले. भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडलेल्या ‘अर्धा तास चर्चे’चा सकारात्मक परिणाम म्हणून हा दौरा पार पडला.

ऊर्जानगरला कोळशाच्या विळख्यातून सोडवणार
ऊर्जानगर निवासी क्षेत्रात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) आणि चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्राच्या कोळसा बंकर व रोपवेमुळे होणाऱ्या प्रदूषणाची मंत्री मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. उघड्यावर होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे हवेत उडणारे धूळकण आणि त्यामुळे नागरिकांना होणारे श्वसनाचे व त्वचेचे गंभीर विकार यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ऊर्जानगरमधील नागरिक प्रदूषणाच्या विळख्यात असून ही केवळ पर्यावरणाची समस्या नसून मानवी आरोग्याशी निगडित संवेदनशील बाब आहे. पंकजाताईंच्या नावातील ‘प’ हा प्रदूषणमुक्ती आणि प्रगतीचे प्रतीक असून त्यांच्या नेतृत्वात हा भाग निश्चितच प्रदूषणमुक्त होईल. त्यावर बोलताना मंत्र्यांनी स्पष्ट केले की, परळी येथील औष्णिक केंद्राचे प्रदूषण त्यांनी जवळून पाहिले असल्याने या समस्येची तीव्रता त्यांना ठाऊक आहे. यासाठी लवकरच एक सविस्तर आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Sudhir mungantiwar : आईने मागणी केली, मुनगंटीवारांनी 24 तासात व्हीलचेअर दिली; संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती

नदी पुनर्जीवन प्राधिकरणाच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूरचा समावेश
शहरातील प्रदूषित झालेल्या झरपट आणि इरई नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. २४ मार्च २०२६ रोजी विधानसभेत झालेल्या चर्चेची दखल घेत मंत्री पंकजा मुंडे यांनी आज झरपट नदीची प्रत्यक्ष पाहणी केली. नदीतील सांडपाणी, औद्योगिक कचरा आणि गाळ काढून नद्यांना पुन्हा प्रवाहित करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी महत्त्वाची घोषणा केली की, राज्यात लवकरच ‘नदी पुनर्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार असून, या प्राधिकरणाच्या पहिल्याच टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील झरपट आणि इरई या दोन्ही नद्यांचा समावेश केला जाणार आहे. यामुळे या नद्यांच्या धार्मिक व ऐतिहासिक वैभवाचे जतन होऊन शाश्वत प्रदूषणमुक्तीला गती मिळणार आहे.

Sudhir Mungatiwar : चंद्रपुरात मुनगंटीवारांचा दमदार ‘पॉवर शो’! भाजपच्या स्थापना दिनी १६३० कार्यकर्त्यांचा पक्षात जाहीर प्रवेश

 

पशुवैद्यकीय सुविधेचाही घेतला आढावा
पर्यावरण दौऱ्यासोबतच पशुसंवर्धन मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी चंद्रपूर येथील जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालयाला भेट दिली. तेथील औषध साठा, मनुष्यबळ आणि अत्याधुनिक सुविधांचा आढावा घेत त्यांनी पशुपालकांना अधिक दर्जेदार व तत्पर सेवा देण्याचे निर्देश दिले.

Sudhir Mungatiwar : चंद्रपुरात मुनगंटीवारांचा दमदार ‘पॉवर शो’! भाजपच्या स्थापना दिनी १६३० कार्यकर्त्यांचा पक्षात जाहीर प्रवेश

या संपूर्ण पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त, महापौर संगीता खांडेकर, सीएसटीपीएसचे अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सुरेश कुंभरे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा करत प्रशासनाने थेट मैदानात उतरून कारवाईची दिशा निश्चित केल्याने चंद्रपूरच्या नागरिकांमध्ये आता समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!