Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, ‘रक्त सांडवायची वेळ येऊ देऊ नका’

 

Allegation of murder by the government : माळसोन्ना येथील आत्महत्या नाही, सरकारने हत्या केल्याचा आरोप

Amravati परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना गावातील तरुण सचिन बालाजी जाधव व त्यांच्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नी ज्योत्स्ना सचिन जाधव यांच्या आत्महत्येच्या घटनेने राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. मात्र ही आत्महत्या नाही. तर सरकारच्या अन्यायकारक धोरणांमुळे घडलेले तिहेरी हत्याकांड आहे, असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. रक्तदान करून जर सरकारचे डोके ठिकाणावर आले नाही तर रक्त सांडवण्याची वेळ येऊ नये, असा इशाराही कडू यांनी दिला आहे.

या प्रकरणी न सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे, ना रस्त्यावर चळवळ दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू म्हणाले की, “जर ही घटना जाती-धर्माच्या वादातून घडली असती, तर गाव पेटले असते, आंदोलन झाले असते, पण आता सगळे शांत आहेत, हेच अधिक धक्कादायक आहे.”

Ravi Rana Attacks on Bachchu Kadu : “सत्तेची पावर होती तेव्हाच जाग आली असती तर…”

शासनाच्या निष्क्रियतेविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध करत त्यांनी माळसोन्ना येथील स्व. जाधव कुटुंबियांच्या घरी जाऊन रक्तदान केले. “हे रक्तदान म्हणजे फक्त श्रद्धांजली नाही, तर सरकारविरोधातील आमचा संताप आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

“जर रक्तदान करून सरकारला अक्कल आली नाही, तर उद्या आमचे रक्त सांडावे लागू नये, हीच अपेक्षा आहे,” असे म्हणत बच्चू कडूंनी सरकारच्या धोरणांवर थेट सवाल उपस्थित केला.

Education department : नियम झुगारून शिक्षणाधिकाऱ्याची नियुक्ती; शिक्षक संघटनेचा संताप

या प्रकारामुळे शासनाने गंभीरतेने लक्ष घालण्याची गरज आहे. शेतकरी, तरुण आणि बेरोजगार यांच्यावर वाढणारा अन्याय, बँकांचे दडपण आणि जीवनावश्यक गरजांचे प्रश्न हे आत्महत्येचे मूळ कारण असून याविरोधात ठोस उपाययोजना व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.