Breaking

Heat Wave : लोकांच्या मागणीला ‘ग्रीन सिग्नल’; दुपारी सिग्नल बंद !

 

The signal will be off in the afternoon : गोंदियात कडक उन्हाचा फटका; रुग्णांची संख्या वाढली

Gondia एप्रिल महिन्यातच ४३ अंश सेल्सियसच्या पार गेलेल्या तापमानामुळे संपूर्ण विदर्भ होरपळत आहे. गोंदिया शहरात देखील उन्हाचा कहर सुरू आहे. नागरिकांना भर उन्हात रस्त्यांवर सिग्नलवर थांबण्याची वेळ येत होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याची मागणी केली होती. त्या मागणीला प्रशासनाने ‘ग्रीन सिग्नल’ दिले आहे.

गोंदिया शहरातील मुख्य चौकांमधील ट्रॅफिक सिग्नल दुपारी १२ ते ३ या वेळेत तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांना भर उन्हात उभं राहण्याची गरज भासणार नाही. उन्हामुळे होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा सकारात्मक परिणाम शहरातील दैनंदिन वाहतुकीवर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Sudhir Mungantiwar : शेतमाल विक्रीसाठी मुनगंटीवारांनी उपलब्ध करून दिली बाजार समिती !

या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. “गेल्या काही दिवसांपासून दुपारी सिग्नलवर उभं राहणं अत्यंत त्रासदायक होतं. सूर्याच्या कडाक्याने अंग भाजून निघायचं. आता हा त्रास थोडा का होईना कमी होणार आहे,” अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

वाढत्या तापमानामुळे उष्माघात, डिहायड्रेशन यांसारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये उन्हामुळे अस्वस्थ होऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस नागरिकांचा उन्हात थांबण्याचा वेळ कमी करणे ही गरज होती, जी प्रशासनाने ओळखली.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, ‘निष्ठावान असाल, तर बॅनरवर नव्हे, कार्यक्रमात हजर राहा’

सिग्नल बंद असताना वाहनचालकांनी अधिक सजग राहून वाहतुकीचं भान ठेवणं गरजेचं आहे. चौक पार करताना एकमेकांना प्राधान्य देत सावधपणे वाहन चालवणं, हा सुरक्षिततेचा सर्वात महत्त्वाचा भाग ठरणार आहे. शिस्तीने वाहन चालवणं आणि गरज असल्यासच दुपारी प्रवास करणं, ही नागरिकांची जबाबदारी राहील.