Breaking

Chandrashekhar Bawankule : पालकमंत्री बावनकुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर संतापले!

One and a half hour review meeting for the Kharif season : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दीडतास समीक्षा बैठक; नियोजनाच्या सूचना

Amravati खरीप हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर कृषी निविष्ठांमध्ये फसवणूक झाल्यास शेतकऱ्याचा संपूर्ण हंगाम उद्ध्वस्त होतो. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर गंभीर गुन्हे दाखल करा, अशा स्पष्ट शब्दांत चेतावणी देत राज्याचे महसूलमंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी तब्बल दीड तास अधिकाऱ्यांचा “क्लास” घेतला. बैठकीला आमदार रवी राणा, प्रवीण तायडे, प्रताप अडसड, उमेश यावलकर, राजेश वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कृषी विभागाच्या तयारीचा व खरीपासाठी निविष्ठांच्या उपलब्धतेचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सादर केला.

Hindi controversy : राज अन् उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देणार नाही

एका अधिकाऱ्याने “बियाणे प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दिले” असे सांगितल्यावर पालकमंत्री बावनकुळे संतापले. “तुम्ही काही उपकार करत नाही, वेगळं काय केलं? किती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, त्यातून कुणाचे उत्पन्न वाढले, नावांसह सांगा!” असे त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. यावेळी केवळ कागदोपत्री काम न करता ठोस परिणामकारक कृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीदरम्यान कृषी अधिकाऱ्यांचे सेवा केंद्र तपासणी, धाड टाकणे, नमुने घेणे याबाबतचे अधिकार कमी झाल्याची बाब समोर आली. “हा विषय आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल,” अशी ग्वाही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली.

Sudhir Mungantiwar : CSR मध्ये पर्यावरण संवर्धनाचीही जबाबदारी स्वीकारावी!

पालकमंत्र्यांचे आदेश

महिनाभर गावनिहाय सभा घ्या
शेतकऱ्यांना उत्पादनवाढीचे मार्गदर्शन करा
सरपंच, लोकप्रतिनिधी यांना सहभागी करा
फीडबॅक घ्या, नावीन्यपूर्ण उपक्रमांची रूपरेषा तयार करा
२९ जुलैपूर्वी सर्व कामे पूर्ण करा
कृषी निविष्ठांतील फसवणूक करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करा
कागदोपत्री काम नको, प्रत्यक्ष परिणाम द्या
गावोगावी शेतकऱ्यांशी संवाद व मार्गदर्शन
कृषी अधिकाऱ्यांचे अधिकार कमी झाल्याचा विषय कॅबिनेटमध्ये मांडणार