Uddhav Thackeray’s Shiv Sena and Raj Thackeray’s Maharashtra Navnirman Sena are preparing in full swing for the July 5th march : काहीही झालं तरी हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही.
Mumbai : राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीची केल्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर सर्वच स्तरांतून त्याला विरोध होतो आहे. याच्याच विरोधात शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या दोन भावांचा एकत्रित मोर्चा ५ जुलैला रोजी निघणार आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीतून मोर्चाला सुरूवात होणार असून आझाद मैदानावर समारोप होणार आहे. या मोर्चातून ठाकरेंची शिवसेना एकीचे बळ सत्ताधाऱ्यांना दाखवणार आहे.
यासंदर्भात खासदार संजय राऊत यांची X वर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. यामध्ये राऊत म्हणतात, ‘हिंदी सक्तीचा सरकार निर्णय, फडणवीसी आदेशाची होळी करण्याच्या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. रविवारी २९ जून रोजी ३ वाजता ही होळी आझाद मैदानावर आयोजित करण्यात येईल. तसेच ५ जुलै रोजी एकजूट मोर्चाच्या तयारीसाठी शाखा प्रमुखांची एक बैठक होईल. या बैठकीत पक्षप्रमुख मार्गदर्शन करतील. २९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता शिवसेना भवन येथे ही बैठक होणार आहे.’
Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्वात मोठे ‘बोलबच्चन’
X वरून संजय राऊत यांनी हिंदी भाषा सक्तीच्या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. आता एकजुटीची ताकद दाखवण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच एक फोटो शेअर करून हिंदी सक्तीच्या सरकारी निर्णयाची होळी करुया. मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया, असंही राऊत म्हणाले आहेत. ५ जुलैचा मोर्चा शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, असा एकत्र निघणार असल्याचीही माहिती राऊत यांनी दिली.