Breaking

Local Body Elections : ईव्हीएम पोहोचले, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला वेग!

EVM machines arrive for Zilla Parishad elections : मतदारसंघांच्या प्रारूप रचनेची घोषणा झाल्यावर प्रक्रिया सुरू

Amravati जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अमरावती जिल्हा प्रशासनाने ईव्हीएम यंत्रांचे वाटप पूर्ण केले आहे. मतदारसंघांच्या प्रारूप रचनेची घोषणा झाल्यानंतर लगेचच ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून विलासनगर येथील सरकारी धान्य गोदामातून तालुक्यावार ईव्हीएम पाठवण्याचे काम हाती घेण्यात आले असून, अनेक ठिकाणी यंत्रांची प्राथमिक चाचणीही (एफएलसी) पार पडत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाकडील माहितीनुसार, आतापर्यंत २,०६८ कंट्रोल युनिट्स (सीयू) आणि २,०८२ बॅलेट युनिट्स (बीयू) तालुक्यांना वितरित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी यापूर्वीच काही यंत्रे शिल्लक असल्यामुळे मागणीनुसार यंत्रांचे वाटप करण्यात आले. वाटपाच्या वेळी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या समक्षच बंगळुरूहून आलेल्या कंपनीच्या अभियंत्यांनी फर्स्ट लेव्हल चेकिंग (एफएलसी) प्रक्रिया राबवली.

Income tax department : ९.९७ कोटींच्या जीएसटी चोरीप्रकरणी अकोल्यातील व्यापाऱ्यास अटक

तालुकानिहाय वाटपाची आकडेवारी :

अमरावती तहसील : ३१५ बीयू, २२८ सीयू
भातकुली : २६७ बीयू, १९३ सीयू
धारणी : २२० बीयू, २१९ सीयू
चिखलदरा : ३४ सीयू
अंजनगाव सुर्जी : १३३ बीयू, १३३ सीयू
अचलपूर : २३२ बीयू, २३२ सीयू
चांदूरबाजार : २२० बीयू, २२० सीयू
तिवसा : १२० बीयू, १२० सीयू
दर्यापूर : १६३ बीयू, १६३ सीयू
नांदगाव खंडेश्वर : १७० बीयू, १७० सीयू
धामणगाव रेल्वे : ११३ बीयू, ११३ सीयू
मोर्शी : ३८ बीयू, ८८ सीयू
वरुड : ५७ बीयू, १२५ सीयू
चांदूर रेल्वे : ३४ बीयू, ३० सीयू

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : शाळांना आता मनमानी फी वाढ करता येणार नाही

अंतिम मतदारसंघ रचना १८ ऑगस्टला

सोमवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आशीष येरेकर यांनी जिल्ह्यातील मतदारसंघांची प्रारूप रचना जाहीर केली आहे. या प्रारूपावर २१ जुलैपर्यंत नागरिकांना हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. प्राप्त सूचनांच्या आधारे जिल्हाधिकारी २८ जुलै रोजी विभागीय आयुक्तांकडे अंतिम प्रस्ताव सादर करतील. त्यानंतर ११ ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडून जनसुनावणी होईल. या प्रक्रियेनंतर आवश्यक बदल करून १८ ऑगस्ट रोजी मतदारसंघांची अंतिम रचना घोषित केली जाणार आहे.