Sanjay Raut : शिंदे पिता-पुत्रांनी हजारो कोटीं लूटले ! फडणवीस सरकार ‘कॅरेक्टरलेस’

Sanjay Rauts explosive allegation of Sumit Facility scam : ‘सुमित फॅसिलिटी’ घोटाळ्याचा संजय राऊतांचा स्फोटक आरोप

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात आज संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमुळे एकच खळबळ उडाली. झारखंडच्या मद्य घोटाळ्यात अटकेत असलेला अमित साळुंखे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत निकटवर्तीय असून, त्याच्या सुमित फॅसिलिटी या कंपनीद्वारे महाराष्ट्रात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

राऊत म्हणाले, सुमित फॅसिलिटी प्रकरण हे इतकं साधं नाही. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे. मद्य घोटाळ्यापासून ते कचरा व्यवस्थापन, अ‍ॅम्बुलन्स टेंडरपर्यंत शिंदे पिता-पुत्रांनी या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कोट्यवधींची कंत्राटं दिली आहेत. या सगळ्या पैशांचा प्रवाह थेट ‘श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन’कडे वळतो, असा दावा करत राऊतांनी सांगितलं की, या फाउंडेशनच्या माध्यमातून काळ्या पैशाचं पांढरीकरण सुरू आहे. सामाजिक कार्याच्या नावाखाली चालणारा हा भ्रष्टाचाराचा खेळ आहे.

Dharmapal Meshram : वंचितांना न्याय देणे ही आयोगाची प्रमुख भूमिका !

संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. फडणवीस सरकार हे ‘कॅरेक्टरलेस’ आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात 75 टक्के मंत्री फक्त दरोडेखोर आहेत. एखादा मंत्री डान्सबार चालवतो, एखादा टॉवेल घालून मारीमारी करतो, तर कुणाच्या बॅगांत पैसेच पैसे दिसत आहेत. हेच आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं चारित्र्य!असा टोला त्यांनी लगावला.

Ladki Bhahin Yojana : हजारो पुरुषांनी घेतला ‘ लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

राऊत यांनी थेट एसआयटी स्थापनेची मागणीही केली. फडणवीसांना एसआयटीचा खूप छंद आहे, मग इथे का नाही? शिंदे पिता-पुत्रांच्या गैरव्यवहारांची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा झारखंड पोलिस एक दिवस तुमच्या मंत्र्यांना उचलून घेऊन जातील, असा इशाराही त्यांनी दिला. फडणवीस यांचा वाढदिवस आणि त्यावर आलेल्या गौरव स्मरणिकेवरूनही राऊतांनी उपरोधिक टीका केली. फुलांचा वास सुकण्याआधीच सरकार सडू लागलंय. तुम्हाला चारित्र्यवान म्हणत असतील, तर कृतीतून ते दिसलं पाहिजे. नाहीतर प्लास्टिकच्या फुलांचाच हा तमाशा आहे.