Revenue Department : 13 हजार प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी विशेष मोहिम

Roadmap for a developed Maharashtra by 2047 prepared, Bawankule : 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप तयार – बावनकुळे

Nagpur : महाराष्ट्रात महसूल सप्ताहाची सुरुवात झाली आहे. यानिमित्त राज्याचे महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यात औपचारिक उद्घाटन केले. बावनकुळे यांनी सांगितले की, महसूल सप्ताहात “सर्वांसाठी घरे” या संकल्पनेतून विविध योजनांतील लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यावर भर दिला जाईल. यासोबतच मोजणी प्रक्रिया, वृक्षारोपण, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान, वाळू धोरण राबविणे, आणि NA प्रकरणांपासून तुकडेबंदी कायदे रद्द करण्याचे काम हाती घेतले जाईल.

राज्यात महसूल विभागात सध्या सुमारे 13 हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. बावनकुळे यांनी यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 18-19 महसूल अधिकाऱ्यांचा सत्कार केला. या अभियानाची पुढची पायरी म्हणजे, दोन दिवसांचे महसुली चर्चासत्र, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रात राज्यभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्त सहभागी होतील.1

Chandrashekhar Bawankule : जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला की असा निर्णय घ्यावा लागतो !

राज्य सरकारने 2047 पर्यंत “विकसित महाराष्ट्र” या दृष्टीकोनातून दीर्घकालीन आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या आराखड्यासाठी नागपूरमध्येच विशेष प्रेझेंटेशन आयोजित केले असून, महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका या अभियानात असणार आहे.