Raj Thackeray meets Fadnavis : राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला !

Discussions are rekindling in political circles : राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण

Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले. ही भेट अचानक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरेंच्या पॅनेलचा दारुण पराभव झाल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या या बैठकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंना एकही जागा जिंकता आली नाही. शशांक राव यांच्या पॅनेलने १४ जागा मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले, तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलने ७ जागा जिंकल्या. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षाने एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती, मात्र ‘ठाकरे ब्रँड’चा या निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला. निकालानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली, परंतु राज ठाकरे यांच्याबाबत सॉफ्ट कॉर्नर दिसून आला.

Parashuram Corporation : परशुराम महामंडळाला गती; व्याज परतावा योजना जाहीर

याआधीही १२ जून रोजी वांद्र्यातील एका हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली होती. त्यावेळी शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांना गती मिळाली होती. मात्र, आता बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर झालेली ही भेट नवी राजकीय समीकरणं तयार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Balaseb Thackeray : केंद्र सरकारमुळे शेतकरी हवालदिल, उद्धव गटाचा हल्लाबोल

या भेटीनंतर राज ठाकरे यांनी भाजप आणि महायुतीकडे परत जाण्याचे दोर अजूनही पूर्णपणे तोडलेले नाहीत, अशी नवी चर्चा रंगू लागली आहे.