Marbat 2025 : महागाई, भ्रष्टाचारावर प्रहार; डोनाल्ड ट्रम्पचाही बडगा !

144 years of tradition and legacy : 144 वर्षांचा परंपरेचा वारसा “इडा-पीडा घेऊन जा” च्या घोषणा

Nagpur : 144 वर्षांचा परंपरेचा वारसा असलेला नागपूरचा ऐतिहासिक मारबत उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. “इडा-पीडा घेऊन जा रे मारबत” या पारंपरिक घोषणांसह निघणाऱ्या या मिरवणुकीत नेहमीप्रमाणेच समाजातील ज्वलंत प्रश्नांवर जनतेचा रोष प्रतीकात्मक बडग्यांद्वारे व्यक्त होत आहे. यावर्षीचे बडगे महागाई, भ्रष्टाचार, स्मार्ट मीटर, व्यसनाधीनता आणि दहशतवादावर थेट प्रहार करणारे आहेत.

मारबत उत्सव हा केवळ धार्मिक परंपरेचा भाग नसून सामाजिक व्यंग आणि जनजागृतीचे प्रभावी व्यासपीठ आहे. महागाई व वाढत्या वीजबिलांमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या भावना यंदा ठळकपणे व्यक्त होत आहेत. शहरातील नेहरू पुतळा, कोतवाली, गांधी पुतळा, आदी ठिकाणांवरून ही मिरवणूक मार्गक्रमण करणार आहे.

India Pak Cricket : भारत पाक क्रिकेट म्हणजे सट्टेबाजीचा बाजार !

विशेष म्हणजे, या उत्सवात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतीकात्मक पुतळाही दिसत आहे. जम्मू-काश्मीरमधील पहेलगामजवळ भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादा विरोधात घोषणाबाजी दिसत असून, ट्रम्प यांच्या भारतावर लादलेल्या अवास्तव कर धोरणावर रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदाचा मारबत उत्सव स्थानिक प्रश्नांबरोबरच आंतरराष्ट्रीय विषयांनाही स्पर्श करणार आहे.

Maratha Movement : मराठा आरक्षण आंदोलनाआधी सरकारचा मोठा निर्णय !

नागपूरकर तरुणांच्या पुढाकारातून उभारलेले हे बडगे महागाई, वीजबिल, भ्रष्टाचार व व्यसनाधीनतेसारख्या प्रश्नांवर थेट संदेश देणारे आहेत. धार्मिक परंपरेच्या चौकटीतून सामाजिक असंतोष मांडणारा हा उत्सव यावर्षीदेखील राजकीय वातावरण तापवणारा ठरणार आहे.