State government begins review : राज्य सरकारकडून फेरपडताळणीला सुरुवात
Mumbai : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरविण्यात आलेल्या आणि त्यांचा लाभ तात्पुरता बंद झालेल्या महिलांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून अशा सर्व लाभार्थ्यांची पुन्हा फेरपडताळणी करण्यात येणार असून पात्र आढळणाऱ्या महिलांना पुन्हा लाभ सुरू होणार आहे. त्यामुळे हजारो महिलांना दिलासा मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची शासनस्तरावर नियमित पडताळणी केली जाते. या पडताळणीत अनेक अपात्र महिला लाभ घेत असल्याचे समोर आले होते. काही शासकीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले होते. परिणामी मोठ्या प्रमाणावर महिलांना अपात्र ठरवत त्यांचा लाभ थांबविण्यात आला होता. त्यामुळे नाराजीचा सूर उमटला होता. आता मात्र राज्य सरकारने फेरपडताळणी करून पात्र महिलांना पुन्हा लाभ देण्याचा निर्णय घेतल्याने या लाभार्थ्यांसाठी ही शेवटची संधी ठरणार आहे.
महिला व बाल विकास विभागाकडून सुरू झालेल्या या प्रक्रियेत अपात्र महिलांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आधारकार्डनुसार 21 वर्षांखालील किंवा 65 वर्षांवरील महिला, तसेच एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या महिलांचा लाभ थांबविण्यात आला आहे. तसेच ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त आहे, आयकरदाता सदस्य आहेत, शासकीय सेवेत कायमस्वरूपी कर्मचारी किंवा निवृत्तीनंतर पेन्शनधारक आहेत, इतर शासकीय योजनेतून दरमहा 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेत आहेत किंवा कुटुंबात विद्यमान अथवा माजी खासदार-आमदार आहेत, अशा लाभार्थ्यांना योजनेत अपात्र ठरविण्यात आले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) असल्यास देखील अपात्रतेचा निकष लागू होतो.
Chikhali Agriculture Office : चिखली कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या!
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे खऱ्या पात्र महिला पुन्हा योजनेच्या लाभात सहभागी होणार असून अपात्रांना दूर ठेवले जाणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
_____








