Vanchit Bahujan Aghadi : भूमिहीन अतिक्रमणधारकांना जमिनीचे वाटप करा!

Allocate land to landless encroachers : वंचित बहुजन आघाडीचा ‘एल्गार’ मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Akola भूमिहीन अतिक्रमणधारकांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत प्राधान्याने समाविष्ट करून जमिनींचे वाटप करण्यात यावे, या मागणीसह विविध प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना देण्यात आले.

मोर्चाच्या माध्यमातून २०११ पर्यंत शासकीय जमिनीवर वहिती करणाऱ्या आणि पुरावे असलेल्या शेतकऱ्यांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. याशिवाय सौरऊर्जा प्रकल्प व ‘एम्स सँड’ प्रकल्प पिके असलेल्या व वहितीच्या जमिनीवर न घेता इतरत्र घेण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली.

New Nagpur City : ११,३०० कोटी रुपये खर्चून साकारले जाणार नवीन नागपूर !

तसेच शहर व ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमित करून संबंधित कुटुंबांना तातडीने घरकुल मंजूर करावे, शहरातील अतिक्रमित फेरीवाले व हातगाडी व्यावसायिकांना कायमस्वरूपी जागा देण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
मोर्चा शहरातील टॉवर चौकातून निघून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेनंतर शिष्टमंडळामार्फत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Pawar Vs Bawankule : जाहिराती कुणी दिल्या ते जाहीर करा !”

या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सदस्य तथा जिल्हा समन्वयक माजी आमदार ॲड. नातिकोद्दीन खतीब, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, आम्रपाली वाघमारे, धम्मा गवई, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, कलीमखान पठाण, मजहर खान, गजानन गवई, मनोहर बनसोड, ज्ञानेश्वर सुलताने, अशोक दारोकार, किशोर जामनिक, चरण इंगळे, सुनील सरदार आदींची उपस्थिती होती.