Ajit Pawar claims to have provided the maximum number of schemes for women : आमदार अमोल मिटकरी यांचा दावा
Akola “लाडक्या बहिणींना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जास्तीत जास्त योजना दिल्या आहेत. महिलांसाठी शासनाने जाहीर केलेल्या या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने पुढाकार घ्यावा,” असे आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केले.
मिटकरी हे शासकीय विश्रामगृह, बसस्थानकाजवळ अकोला येथे झालेल्या जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी अजितदादांच्या निर्णयांचा व शासनाच्या महिला धोरणांचा प्रचार-प्रसार जनजागृतीच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
OBC Reservation Struggle : ओबीसी उपसमितीच्या बैठकीत साडेतीन हजार कोटींच्या योजनांवर चर्चा !
बैठकीच्या प्रास्ताविकात जिल्हाध्यक्षा प्रतिभाताई अवचार यांनी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महिलांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या बैठकीस आमदार अमोल मिटकरी, प्रदेश पदाधिकारी संध्याताई वाघोडे, छायाताई कात्रे, अमोल काळणे, सुषमाताई राठोड, विद्यार्थी अध्यक्ष अदनान, सामाजिक न्याय अध्यक्ष प्रकाश खाडे, रिजवान बाबा, किशोर तेलगोटे यांसह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. स्वागत जिल्हाध्यक्षा प्रतिभाताई अवचार यांनी केले.
OBC Reservation : ‘तो’ जी आर रद्द करण्यासाठी काँग्रेस सरसावली !
यावेळी जिल्हा उपाध्यक्षा आशा गोपाळ शिंदे, लिलाबाई देविदास गावंडे, शारदा थोटे, सुनंदाताई नवघरे, ज्योती वाहोकार, निशा ठाकरे, मंजूषा देशमुख, शुभांगी तायडे, रंजना सिरसाट यांसह जिल्हा व तालुकास्तरीय महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन रेणुका तायडे यांनी केले तर आभार उमाताई महल्ले यांनी मानले.








